yuva MAharashtra सध्या सौंदर्यसुंदरी बनण्यापेक्षा तरुणींनी झाशीची राणी बनण्याची गरज, यासाठी ही शस्त्रे गरजेची !

सध्या सौंदर्यसुंदरी बनण्यापेक्षा तरुणींनी झाशीची राणी बनण्याची गरज, यासाठी ही शस्त्रे गरजेची !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच, महाराष्ट्रातही पाठोपाठ अशा घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे तरुणी व महिला वर्गात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळी अथवा रात्री कामावरून परतणाऱ्या कष्टकरी तरुणी, महिलांमध्ये तर प्रचंड दहशत दिसून येत आहे. संकटसमयी पोलिसांचा टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यरत आहेत. मात्र अशा कठीण प्रसंगात ही मदत मिळवण्याचे भान उरत नाही. म्हणूनच आता तरुणी व महिलांनी स्वतःच स्वतःचे रक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पण यासाठी काय करावे ? कोणाची मदत घ्यावी ? याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे ठरले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मा.अटलजींच्या एका कवितेचे सद्यःस्थितीतील स्मरण......

उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो
अब गोविन्द न आयेंगे।

कब तक आस लगाओगी तुम
बिके हुए अखबारों से।

कैसी रक्षा मांग रही हो
दु:शासन दरवारों से।

स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोबिन्द न आयेंगे।

कल तक केवल अंधा राजा
अब गूंगा बहरा भी है।

होंठ सिल दिये हैं जनता के
कानों पर पहरा भी है।

तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे
किसको क्या समझायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोबिन्द न आयेंगे।

छोड़ो मेंहदी भुजा संम्भालो
खुद ही अपना चीर बचा लो।

द्यूत बिठाये बैठे शकुनि
मस्तक सब बिक जायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोविद न आयेंगे।

आणि यासाठी अशा संकटसमयी हमखास उपयोगी पडणाऱ्या अत्यावश्यक वस्तू आपल्याजवळ असणे क्रमप्राप्त ठरत आहे. यापुढे तरुणी व महिलांनी आपल्या पर्समध्ये सौंदर्य प्रसाधनाबरोबरच स्वसंरक्षक वस्तु ठेवणे अत्यावश्यक बनले आहे. परंतु याबाबत महिलांना अशा वस्तूंची माहिती असतेच असे नाही. याकरिता ही उपयुक्त माहिती तरुणी व महिलांना उपयोगी पडू शकते.


सेफ्टी टॉर्च

महिला एकट्या घराबाहेर पडताना त्यांच्या पर्समध्ये शॉक इफेक्टसह सेफ्टी टॉर्च ठेवू शकतात. या सेफ्टी टॉर्च महिलांना एकट्या बाहेर असताना खूप उपयोगी पडू शकतात. या टॉर्चच्या मदतीने महिला स्वतःचे संरक्षण करू शकतात.

पेपर स्प्रे

पेपर स्प्रेची एक छोटी बाटली महिलांना अगदी मोठ्या समस्यांपासून वाचवू शकते. अशा परिस्थितीत महिला घराबाहेर पडताना बॅगमध्ये तिखट पेपर स्प्रे घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास धाग्याच्या साहाय्याने ब्रेसलेटमध्येही बांधू शकता.

पेपर जेल

पेपर जेल देखील महिलांसाठी सर्वोत्तम सुरक्षिततेचे साधन ठरू शकते. हे जेल तुम्ही दुरूनही शत्रूवर वापरू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर जाताना तुमच्या पिशवीत Paper Gel घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

स्विस चाकू

महिला स्विस चाकू वापरून स्वतःचे संरक्षण करू शकतात. स्विस चाकूऐवजी, तुम्ही तुमच्या पर्समध्ये सामान्य चाकू किंवा नेल कटर देखील ठेवू शकता. यामुळे तुम्हाला हल्लेखोराला त्वरित प्रतिकार करणे सोपे होईल. 


अर्थात टोल फ्री क्रमांक लावण्याइतकंच आणीबाणी प्रसंगात या वस्तू तात्काळ वापरण्याचे प्रसंगावधान तरुणी व महिलांनी दाखवण्याचे गरज आहे. वरील सर्व वस्तू आपल्याला ऑनलाईन मागवता येऊ शकतात किंवा अगदी स्थानिक बाजारपेठेतही त्या सहज उपलब्ध होऊ शकतात. सध्याच्या आणीबाणीच्या प्रसंगी सौंदर्यसुंदरी बनण्यापेक्षा झाशीची राणी बनणे व प्राप्त आहे. आणि म्हणूनच प्रत्येक बंधू भगिनींनी ही माहिती केवळ स्वतः पुरतीच मर्यादित ठेवण्याऐवजी अधिकाधिक भगिनींपर्यंत पोहोचवणे हेही तितकेच अत्यावश्यक आहे.