| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २८ ऑगस्ट २०२४
मिरज शहरातील प्रमुख मार्ग असलेला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात येणाऱ्या अडचणी बाबत सहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार विशाल दादा पाटील यांनी मिरज शहर सुधार समितीला दिली.
खा. विशाल पाटील हे एका कार्यक्रमासाठी सोमवारी संध्याकाळी मिरज येथे आले होते त्यावेळी मिरज शहर सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर यांनी त्यांची भेट घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे गेल्या दोन वर्षापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी काही मिळकतदारांना द्यावे लागणारे दहा कोटी 65 लाखांची नुकसान भरपाईची तरतूद, रस्त्यात बाधित होणारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकाची भिंत हटवणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्ता दुभाजक, अवघ्या एका पावसाळ्यातच या रस्त्याचे दुरवस्था झाली असून तो पूर्णपणे उघडला आहे.
या रस्त्याचे काम अर्धवट असतानाही संबंधित ठेकेदाराला 90 टक्के रक्कम अदा करण्यात आल्यामुळे रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी तक्रारींचा पाढा वाचून प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी खा. विशाल पाटील यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत, रस्त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे संयुक्त बैठक आयोजित करण्याचे सूचना केली. आताही बैठक सप्टेंबर रोजी होणार आहे.
खा. विशाल पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये माजी नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, बसवेश्वर सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, कार्यवाह जहीर मुजावर, रामलिंग गुगरी, अभिजीत दाणेकर, सलीम खतीब, संतोष जेडगे, वसीम सय्यद, विजय सालार, राजेंद्र झेंडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.