yuva MAharashtra सरकार येईल जाईल, पण नारीची प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे - नरेंद्र मोदींचे परखड मत !

सरकार येईल जाईल, पण नारीची प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे - नरेंद्र मोदींचे परखड मत !


| सांगली समाचार वृत्त |
जळगाव - दि. २६ ऑगस्ट २०२४
गेल्या काही दिवसापासून राज्यासह देशात महिला अत्याचारांवरील गुन्ह्यात मोठेमी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रात बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सरळ टाकले होते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.

जळगाव येथे संपन्न झालेल्या लखपती दीदी कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करीत, महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत अक्षम्य पाप असल्याचे म्हटले आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल, भले तो कितीही मोठा असो त्याला सोडू नका त्याला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता कामा नयेत सूचना करून पंतप्रधान म्हणाले की पोलीस आणि सर्वच स्तरावर कारवाई झालीच पाहिजे. सरकारी येतील आणि जातील पण नारी शक्तीकडे लक्ष दिले गेले पाहिजे. देशात महिलांवरील अत्याचाराबाबत कडक कायदे केले जात आहेत. एफआयआर होत नाही, वेळ लागतो अशा अडचणी समोर येत होत्या. मात्र आता आम्ही न्याय संहिता मधून त्या दूर केल्या आहेत. ई-एफ आय आर सुरू केला आहे, यामुळे गडबड होणार नाही आता जलद प्रतिसाद मिळेल. 


लग्नाच्या नावाखालीही फसवणूक होत होती, त्याबाबतही कायदा केला गेला आहे महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या सोबत आहे असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र वेबसाईट भारताचा चमकता तारा आहे गुंतवणुकीसाठी आणि नोकरीसाठी ही चांगला आहे. महायुतीचे सरकार म्हणजे उद्योग आणि नोकरीची गॅरंटी आहे. आता स्थिर सरकार देण्यासाठी महायुतीची गरज असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.