yuva MAharashtra लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पहिला हप्ता तीन नव्हे, साडेचार हजारांचा - मुख्यमंत्री !

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पहिला हप्ता तीन नव्हे, साडेचार हजारांचा - मुख्यमंत्री !


| सांगली समाचार वृत्त |
जळगाव - दि. १६ ऑगस्ट २०२४
राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची १५०० रुपये जमा होणार का ? अशी शंका, योजना जाहीर झाल्यानंतर कालअखेर ज्या काही घटना घडल्या होत्या, त्यामुळे सर्वांच्याच मनात निर्माण झाल्या होत्या. अगदी सर्वोच्च न्यायालयाने या योजनेबाबत निर्वाणीचा इशारा दिला होता. परंतु सर्व अडथळ्यांचे शर्यत पार करीत ही योजना आता पूर्णत्वास जात आहे वास्तविक 17 ऑगस्ट रोजी अर्ज मंजूर झालेल्या सर्व महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार असे सांगितले जात होते. परंतु गेल्या दोन दिवसापासून काही महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले. तर आता उर्वरित महिलांच्या खात्यावरही ही रक्कम जमा होणार असल्याची खात्री शासनामार्फत देण्यात आली. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील बहिणींना भेटण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी घोषणा केली असून सर्व पात्र महिलांच्या खात्यावर तीन नव्हे तर साडेचार हजार रुपये जमा होतील असे म्हटले आहे. 


राज्यात आतापर्यंत एक कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना तीन हप्त्यांचे एकत्रित साडेचार हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता भगिनी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाचे रक्षाबंधन त्यांच्यासाठी खास असणार आहे.