| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १० ऑगस्ट २०२४
अलीकडे ऑनलाईन बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असला तरी, काही व्यवहार धनादेशाद्वारेच केले जातात. परंतु ग्राहकाकडून मिळालेला धनादेश आपल्या खात्यावर जमा होण्यास दोन दिवस, केव्हा काही काही वेळा त्याहीपेक्षा अधिक कालावधी लागत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना खेळते भांडवल हाती राहण्याची अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन, रिझर्व बॅंकेच्या पतधोरण समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता धनादेश काही तासातच क्लिअर होणार असल्याने व्यावसायिक व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे संपन्न झाली अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती, त्यामुळे रेपो दरात बदल होणार का याकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते. परंतु समितीने रेपो दरात कोणताही बदल तूर्तास केला नाही. मात्र धनादेशाने होणाऱ्या व्यवहारांना गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेऊन, एक बदल केला आहे. त्यानुसार आता धनादेश झटपट क्लियर होणार आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी धनादेश व्यवहार पद्धतीसाठी सीटीएस दोन दिवसाचा कालावधी लागत असल्याचे सांगून आता या बदलामुळे त्याच दिवशी अवघ्या काही तासातच धनादेश वाटतील आणि संबंधित रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनादेश बाउन्स झाला तर संबंधितांना लगेच याचे कारण समोरच्या व्यक्तीला द्यावे लागणार आहे. परिणामी यामुळे चेक द्वारे होणारी फसवणूकही कमी होण्याची वर्तवण्यात येत आहे. जे व्यापारी धनादेशाद्वारे व्यवहार करत असतात, त्यांना हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे