| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० ऑगस्ट २०२४
सांगली जिल्ह्यात खून, दरोडे, जबरी चोरी, मारामाऱ्या, चेन स्नॅचिंग अशा घटनांची मालिका सुरू असतानाच, पोलिसांकडून विविध गुन्ह्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. विश्रामबाग पोलिसांनी आजीच एक धडक कारवाई केली असून विश्रामबाग परिसरातील वारणाली येथील एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आले असून, त्याच्याकडील दुचाकीसह सव्वा लाखांचे दागिने जप्त करण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही धडक कारवाई केली असून हबीब दिलावर शेख रा. हनुमान नगर सांगली) असे या अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास रस्त्याने जात असलेल्या रंजना पाटील या वारणालीत रहात महिलेच्या गळ्यातील दागिने आणण्यात आले हिजडा मारून जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने यातील चोरट्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करीत होते. या पथकातील बिरोबा नरळे आर्यन देशिंगकर, योगेश पाटील यांना, खबऱ्यामार्फत ही चोरी हबीब शेख याने केल्याची माहिती मिळाली. तेव्हा विश्रामबाग पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चेतन माने, स्वप्निल पोवार, संजय अस्वले, बिरोबा नरळे, संदीप साळुंखे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने हबीब शेख याला अटक करून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.