yuva MAharashtra लाडक्या बहिणी सारख्या योजना म्हणजे शासनाचे व्हेंटिलेटर, अर्थतज्ञ नीरज हातेकर यांची परखड भूमिका !

लाडक्या बहिणी सारख्या योजना म्हणजे शासनाचे व्हेंटिलेटर, अर्थतज्ञ नीरज हातेकर यांची परखड भूमिका !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १८ ऑगस्ट २०२४
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जरी राज्यातील महिलांसाठी आकर्षक असले तरी, ती राज्यासाठी व्हेंटिलेटरसारखी तात्पुरती जीवन संजीवनी देण्यासारखी आहे, अशी टीका प्रसिद्ध अर्थतज्ञ नीरज हातेकर यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांनी या योजनेवर घेतलेला आक्षेप खराच मानायचा का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

या योजनेबाबत हातेकर म्हटले की, महाराष्ट्रातील ग्रामीण दारिद्र्य हे बिहार पेक्षा अधिक आहे. येथील 30 ते 35 टक्के जनता शेती उत्पादनावर अवलंबून आहे. परंतु रात्रंदिवस काबाडकष्ट करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. राज्याचं शेतीचं बजेट 35 हजार कोटी आहे. पण जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येणार आहे, तिचे बजेट या शेतीच्या बजेटपेक्षा मोठे आहे ? हा विरोधाभास आहे. यासाठीचा निधी शासन कुठून आणणार ? असा सवालही हातेकर यांनी केला आहे.

दरम्यान एका माहितीनुसार लाडक्या बहिणींना पहिल्या 3000 रुपयांच्या हप्त्यातच शासन मेटाकोटीला आले आहे. त्यामुळे अर्थतज्ञ नीरज हातेकर यांच्या या टिपणीवर आता विरोधी पक्ष शासनाला कोंडीत पकडण्याची शक्यता असून, विरोधी पक्ष नेत्यांना हे आयते खोलीतच हाती मिळालेले आहे.