| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
गेल्या काही महिन्यापासून जुना बुधवार रस्त्यावरील समाज कल्याण कार्यालयाजवळील आरटीओच्या इमारतीत, वाहन विषयक नोंदणीचे कामकाज सुरू आहे परंतु येथील अपुरी इमारत व सोयी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. याची दखल घेऊन पूर्वीप्रमाणेच वसंतदादा वसाहतीमधील आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्सची चाचणी होणार असल्याची माहिती, उपप्रादेशिक परिवाहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली आहे.
जुन्या रस्त्यावरील आरटीओ इमारतीमध्ये सर्व सोयीसुविधा पूर्ण होईपर्यंत, बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 पासून ही लर्निंग लायसन्सची चाचणी माधवनगर रस्त्यावरील, वसंतदादा औद्योगिक वसाहती मधील आरटीओ कार्यालयात पूर्वीप्रमाणे होणार आहेत. या निर्णयामुळे वाहन चालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.