| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भोकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन, चित्र प्रदर्शन कार्यक्रम, तसेच महिला सुरक्षा, निर्भया पथक कामकाज, स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सादरीकरणास, सांगली मिरजेतील एक व विविध शाळातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद लाभला.
एम टी एस स्कूल, मनपा शाळा नंबर 23, मिरज हायस्कूल मिरज, मालू हायस्कूल सांगली, ए. बी. पाटील तसेच आप्पासाहेब बिरनाळे स्कूल सांगली या शाळेतील 625 विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक स्टाफ, तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींना नवीन कायदे ज्ञान, गुड टच बॅड टच, विषयी माहिती, निर्भया पथक कामकाज, त्यांचे फोन नंबर, व अल्पवयीन बालकांविषयी कायद्याच्या मार्गदर्शन, स्वसंरक्षण करण्याबरोबरच पीडित मुलींनी नि:संकोचपणे तक्रार देण्याकरता आवाहन करण्यात आले. सदर पिडीतेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही सांगण्यात आले. डायल 112 कॉल चे कामकाज व योग्य वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरिता पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्री. दादासाहेब चुडाप्पा, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिंदे, सांगली निर्भया पथक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुतळे त्याचप्रमाणे महिला कक्षाकडील सर्व उपस्थित होता.
महाराष्ट्रात सध्या मुली व महिलांच्या अनुषंगाने घडत असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलांकडून घेण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमाचे कौतुक शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी कडून करण्यात आले. यावेळी उपस्थित त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.