| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ ऑगस्ट २०२४
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील तणाव सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून उद्धव ठाकरे हे फडणवीस यांना खुन्नस देत असतानाच देवेंद्र फडणवीस मात्र तितक्याच शांतपणे आणि सभ्य भाषेत उत्तर देताना दिसत आहेत. त्यामुळे ठाकरे यांचा संयम सुटत चालला असून ते आता एकेरी भाषेवर आले आहेत. बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमांमध्ये " एक तर तू राहशील किंवा मी राहीन" अशा एकेरी भाषेत आव्हान दिले होते, याला देवेंद्र फडणवीस यांनी "योग्यवेळी उत्तर देऊ !" असे सांगून उद्धव ठाकरे यांना बेदखल केले.
मुंबईत ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलेच, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांवर हे शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. अनिल देशमुख यांनी फडणवीस साहेबांवर केलेल्या आरोपाचा संदर्भ देत ठाकरेंनी फडणवीस यांचा थेट एकही संदर्भ देत विधान केलं होतं. मला व आदित्य ठाकरे यांना आत टाकण्याचा फडणवीस यांचा डाव होता हे सगळं सहन करून मी हिमतीने उभा राहिलोय, आता एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह पैसा काहीच नाही. पण शाखाप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या हिमतीवर मी त्यांना आव्हान देत आहे असं ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला बेदखल करत देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने संयमी व सुसंस्कृत उत्तर दिले त्याची चर्चा आता सर्वत्र दिसून येत आहे.