| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑगस्ट २०२४
संस्थापक चेअरमन आदिनाथ धनपाल नसलापुरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली, अवघ्या एका वर्षात सहकारी क्षेत्रामध्ये गगन भरारी घेतलेल्या आदिअरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या सहाव्या शाखेचे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी राजाराम तथा पप्पू डोंगरे यांच्या शुभहस्ते आज शानदार उदघाटन होत आहे.
संस्थेच्या यापूर्वी वखार भाग, सांगली, देशिंग, युवा वाणी चौक, कवठेमहांकाळ, हायस्कूल रोड मिरज, आणि नारायण पेठ पुणे या ठिकाणी असलेल्या सर्वच शाखेतून, पारदर्शक व सभासदांच्या हिताचा विचार करून स्वच्छ कारभार केला जातो. परिणामी संस्थेवर ठेवीदारांचा मोठा विश्वास निर्माण झाला आहे. तसेच संस्थेकडून गरजवंतांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात येतो. संस्थेची कर्ज वसुलीही अत्यंत उत्तम आहे. संस्थेत ठेवीवर दहा ते बारा टक्के व्याज दिले जाते. वखारभाग शाखेत लॉकर सुविधा असून, कुपवाड व देशभक्ती शाखेत एटीएम ची सुविधा असल्याने या भागातील नागरिकांची मोठी आर्थिक सुविधा निर्माण झाली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संस्थेच्या सभासद हितवर्धक कार्याची दखल घेऊन, आदर्श फाउंडेशन तर्फे, आदर्श चेअरमन सन्मान (2023), फायनान्स या विभागाकडून ऑरेंज एफएम 93. 5 यांचा, बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड आणि पुढारी सहकार परिषदेतर्फे, विशेष सन्मान करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी बुधगाव ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. वैशाली विक्रम पाटील, उपसरपंच अविनाश गोरख शिंदे, बुधगावच्या ग्रामसेविका सौ. कल्पना अर्जुनदास राठोड, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बुधगाव मधील आदिअरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या या नूतन शाखेमुळे बुधगाव व परिसरातील ग्रामस्थांचे पतवाढीच्या दृष्टीने मोठी सोय होणार असून, ठेवीदारांनाही विश्वासाचे दालन उपलब्ध झाले आहे.