yuva MAharashtra मिरज येथे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने दंगा काबू योजना आणि रूट मार्च !

मिरज येथे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने दंगा काबू योजना आणि रूट मार्च !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३१ ऑगस्ट २०२४
आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी स्टेशन चौक मिरज येथे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दंगा काबू योजना राबविण्यात आली. त्यानंतर स्टेशन चौक मिरज येथून रूट मार्च सुरू करून तो स्टेशन चौक, मिरासाहेब दर्गा, भंडारी बाबा दर्गा, चप्पल मार्केट चौक, पोलीस स्टेशन चौक, किसान चौक, महाराणा प्रताप चौक, सराफ कट्टा मार्गे बॉम्बे बेकरी, गणेश तलाव येथे संपवण्यात आला. 

या रूट मार्चमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री प्रणिल गिल्डा, तहसीलदार मिरज सौ, अर्चना मोरे-धुमाळ, सांगली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रविकांत अडसूळ, उपायुक्त संजीव ओहोळ यांच्यासह सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे सर्व शाखेचे प्रमुख, तसेच एम. एस. ई. बी. मिरज येथील शाखा कार्यकारी अधिकारी श्री. खांडेकर, व श्री. रेडकर, सांगली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी श्री. रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी श्री माळी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधीर भालेराव, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री भैरू तळेकर, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अजित सिद, मिरज उपविभागातील सपोनी श्री. सुनील गिड्डे, सपोनी श्री. दीपक भांडवलकर, सपोनी श्री. जयदीप कळेकर यांच्यासह एकूण 14 पोलीस अधिकारी, मिरज उपविभागातील 60 पोलीस अंमलदार व पोलीस मुख्यालय कडील एक अधिकारी तसेच बावीस अंमलदार असे एकूण आरसीबी एक प्लॅटून हजर होते.


त्याचप्रमाणे आगामी गणेशोत्सव 2024 व ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने काल दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सांगली, मिरज, आणि कुपवाड महापालिका विभागीय कार्यालय मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरातील गणेशोत्सवाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य व वकील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये श्री प्रणिल गिल्डा मिरज यांनी आगामी गणेश उत्सव सण हा डॉल्बीमुक्त साजरा करावा, गणेशोत्सव मंडळांनी लेझर लाईटचा वापर टाळावा, मिरजेत डीजेवर नक्कीच नियंत्रण ठेवले जाईल. तसेच दिल्ली यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत केलेल्या मार्गदर्शक सूचना याबाबत प्रबोधन केले.

मिरज शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी मिळणाऱ्या वर्गणीचा चांगल्या विधायक कामासाठी उपयोग करावा व मा पोलीस अधीक्षक सांगली यांनी केलेल्या आवाहनानुसार आपल्या गणेशोत्सव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा असे आवाहन केले.

या उपस्थित असलेले जेष्ठ पत्रकार मोहन वाटवे, शंकर परदेशी, ओंकार शुक्ल, माधव गाडगीळ, अजगर शरीर मसलत, जमीर शेख, गजानन कल्लोळी, विराज कोकणे, तानाजी रुईकर, विजय बल्लारी यांनी डॉल्बी मुक्त व लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करून पोलीस विभागाला सहकार्य करावे अशा सूचना मांडल्या.