Sangli Samachar

The Janshakti News

राज्य शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करिता स्पर्धेचे आयोजन, बक्षीसांची लयलूट !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी सहभागी होऊ शकतात या स्पर्धेसाठीचे अर्ज पु
 ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. संपूर्ण भरलेला अर्ज महोत्सव.plda@Gmail.कॉम या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द 12 दल ठरविण्यात येणार आहे असे अकादमीच्या संचालिकि मीनल जोगळेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारे कळविले आहे.


ही स्पर्धा निशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरता राबविण्यात आलेले उपक्रम, गड किल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृती तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण, गणेश भक्तांसाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असे समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत, म्हणून प्रोत्साहन पर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे.

दिनांक ७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने गठित केलेली जिल्हास्तरीय समिती, या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे चार जिल्हे प्रत्येकी तीन आणि हे चार जिल्हे वगळता आणि 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारशी राज्यस्तरीय परीक्षेसाठी स्वीकारल्या जातील.

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना रुपये 25 हजार रुपयांचे पारदर्शक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले असून स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.