Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील जेष्ठ व्यक्तिमत्व श्री. रावसाहेब पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑगस्ट २०२४
सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंतले. विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तींची या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

पालकमंत्री ना. सुरेश मभाऊ खाडे, आ. सुधीरभाऊ गाडगीळ यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच प्रामुख्याने काँग्रेसचे युवा नेते श्री. जितेश कदम, सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते श्री. पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, भाजप नेते श्री. शेखर इनामदार, सांगलीचे माजी महापौर श्री. सुरेश पाटील, उद्योजक श्री. भालचंद्र पाटील समृद्धीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. सुरेश पाटील, इनाम धामणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. सुरेश पाटील, ज्येष्ठ व्यापारी श्री. मनोहर सारडा श्री सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमन श्री. प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार,
प्राचार्य डी. डी. चौगुले सर, माजी नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेवक श्री. राजेश नाईक, माजी नगरसेवक श्री. आयुब पठाण, श्री. रवींद्र वळवडे, माजी नगरसेवक श्री. मंगेश चव्हाण, डॉ. अजित जगोंडा पाटील, श्री. डी. ए. पाटील सर जयसिंगपूर, श्री. रवींद्र पाटील इचलकरंजी, श्री. अभय पाटील सांगली, श्री. एस. आर. पाटील, श्री. आर. एस. चोपडे, माजी महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी,


माजी नगरसेवक श्री. वीरेंद्र थोरात, महाराष्ट्राचे पतसंस्था फेडरेशनचे श्री. शशिकांत राजोबा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष श्री रवींद्र माणगावे, उद्योजक सुदर्शन हेरले, श्री. विनोद पाटोळे, श्री. राहुल सकळे नांद्रे, सारस्वत बँकेचे सांगली येथील वरिष्ठ अधिकारी डॉ. आशुतोष चोपडे, जिव्हाळा ग्रुप सांगलीचे सर्व मान्यवर सदस्य, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ अशोक सकळे, संचालक श्री. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, श्री. वसंतराव नवले, श्री. ए. के. चौगुले, श्री. लालासो थोटे, श्री. नरेंद्र खाडे तसेच जनरल मॅनेजर श्री. अनिल मगदूम, आणि विविध शाखांचे सल्लागार, संचालक, पदाधिकारी, कर्मचारी वर्ग आणि सदस्य उपस्थित होते.

मा श्री रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथळी तालुका शिरोळ येथील ग्रामस्थांनी विविध उपक्रम राबवले होते. कोथळी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आष्टा पीपल्स बँकेचे श्री. दिलीप वर्षानी, पंचगंगा कारखान्याचे माजी व्हा चेअरमन श्री धनगोंडा पाटील श्री जीवन पाटील श्री अरुण पाटील कोथळी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच श्री संजय खवाटे आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ना राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्री. रावसाहेब पाटील यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आर्थिक, सहकार क्षेत्रात प्रचंड काम केल्याचा उल्लेख करून, आता राजकीय क्षेत्रात मही काम करावे व लवकरच आमदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी सर्व सहकार्य करू असे आश्वासन दिले.

दक्षिण भारत जैन सभा, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली, शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग सांगली, जिल्हा शिक्षण संस्था संघ, विराचार्य पतसंस्था सांगली इत्यादी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. केमिस्ट संघटनेतील विविध पदाधिकारी आणि केमिस्ट यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय सांगली व सांगलीच्या पंचक्रोशीतील, विविध गावातील मान्यवर नेते मंडळी, प्रतिष्ठित, मान्यवर तसेच रावसाहेब पाटील यांचे जन्मगाव ब्राह्मनाळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आप्तेष्ट परिवार, मित्रपरिवार इत्यादींनीही रावसाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याशिवाय अनेक मान्यवरांनी त्यांना फोनवरूनही शुभेच्छा दिल्या.