Sangli Samachar

The Janshakti News

अनिकेतची हत्या नात्यातील महिलेशी प्रेमसंबंधाच्या रागामुळे, संशयित ताब्यात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ ऑगस्ट २०२४
जामवाडीतील मरगोबाई मंदिरा नजिक अनिकेत हे परकर याचा कोयत्याने वार करून निर्गुण खून करीत पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. तसेच या खून प्रकरणात सहभागी असणाऱ्या चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सदर संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसलेल्या संशयतांना पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. मंगेश उर्फ अवधूत संजय आरते (रा. मरगूबाई मंदिरा नजिक, जामवाडी) आणि जय राजू कलाल (वय 18, उदय मटन शॉपनजिक, पटेल चौक, जामवाडी)

सांगली शहरातील गजबजलेल्या जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ मंगळवारी अनिकेत हिप्परकर याची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. संशयित मंगेश आरते यास त्याच्या नात्यातील एका महिलेसाठी अनिकेत हिप्परकर याचे प्रेम संबंध आहेत असा संशय होता. याच कारणावरून 23 ऑक्टोबर 2023 रोजी संशयित मंगेश आरते याच्या वाढदिवसा दिवशी मयत अनिकेत याच्या समवेत मंगेशचा वाद झाला होता. त्यामुळे मंगेश आणि अनिकेत हिप्परकर याचा काटा काढण्याचा प्लॅन होता. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित मंगेशने आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने डाव साधून अनिकेत याचा गेम केला. त्यानंतर हे संशयित फरार झाले होते.


या घटनेनंतर सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार संतोष आणि गौतम कांबळे यांना सदर संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसल्या मची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तातडीने नदीकाठ परिसरात धाव घेऊन, हल्लेखोर पळून जात असतानाच पाठलाग करून जेरबंद केले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक केशव रणदिवे, महादेव पोवार, खाडे तसेच पोलीस कर्मचारी विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदीप कुंभार, योगेश सटाले आदींचा समावेश होता.