Sangli Samachar

The Janshakti News

कामगार कल्याण साठी शासन कटीबद्ध, पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांची ग्वाही !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २८ ऑगस्ट २०२४
राज्यात सुमारे पाच लाख आठ हजार घरेलू कामगारांची नोंदणी झाली असून, आपल्या मंत्रिपदाच्या कालखंडात सुमारे 30,500 इतक्या घरेलू कामगाराचे नोंदणी महामंडळाकडे करण्यात आली आहे. या सर्व घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी शासन पर्यायाने आपण कटिबद्ध असल्याचे ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी दिली. मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्या वतीने गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण, ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

घरेलू कामगारांना म्हणून बोलताना ना. डॉ. लांड सुरेश भाऊ खाडे म्हणाले की, घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असणाऱ्या कामगारांसाठी विभागामार्फत चार लाभार्थी योजना सुरू करण्यात आल्या असून, मागील वर्षभरात या कामगारांना सुमारे एक कोठे 88 लाख इतकी लाभाचे रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 2,424 घरेलू कामगारांचे नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी 1,324 घरेलू कामगारांना अंदाजे 9000 रुपये इतक्या किमतीच्या भांड्यांचा संच वाटप करण्यात आला आहे उर्वरित घरेलू कामगारांनाही लवकरच मेळावा घेऊन या किटचे वाटप करण्यात येईल असे ना. डॉ. डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले.


यावेळी श्रीमती सुमन खाडे, अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहाय्यक कामगार आयुक्त (कोल्हापूर) विशाल घोडके, सहाय्यक कामगार आयुक्त (सातारा) एन. एस. भिसे, सहाय्यक कामगार आयुक्त (सांगली) मुजम्मिल मुजावर, माजी नगरसेविका तथा घरेलू कामगार संघटक स्वाती शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीमती प्रणाली कोळी व रूपाली पन्हाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ तर आभार प्रदर्शन सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मिल मुजावर यांनी केले. बालगंधर्व नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी श्रीमती ज्योती कांबळे, , प्रवीण लावंड, अनघा कुलकर्णी, अरुण राजमाने, काकासाहेब धामणे, स्नेहल जगताप, आम्रपाली कांबळे, अनुप वाडेकर यांच्यासह घरेलू कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.