| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑगस्ट २०२४
कोलकत्ता येथील आर जे कार मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या विद्यार्थिनी वरील अत्याचाराच्या निषेधार्थ काल संध्याकाळी सांगली येथे आय.एमए.तर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी 'हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या' अशी मागणी करण्यात आली. सांगली आमराईपासून हा कॅन्डल मार्च स्टेशन चौकात आल्यानंतर येथे मृत डॉक्टरला श्रद्धांजली वाहण्यात आली. तेव्हा तेथे सहभागी झालेल्या अनेकांना गहिवरून आले. या कॅण्डल मार्च नंतर सांगलीत मुसळधार पाऊस कोसळला. तेव्हा सांगलीत चर्चा रंगली की, या कॅन्डल मार्चने सहभागीच नव्हे तर निसर्गही गहिवरला...
कोलकत्यातील महिला डॉक्टर वर झालेला अत्याचार व कोणाच्या निषेधार्थ आय एम ए सांगलीच्या वतीने काल संध्याकाळी काढण्यात आलेल्या कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिला डॉक्टर हातात मेणबत्ती घेऊन सहभागी झाल्या होत्या त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यवसायातील सर्व शाखांचे डॉक्टरही सहभागी झाले होते तेव्हा उपस्थितांनी 'वुई वॉन्टस जस्टिस' अशा घोषणा दिल्या.
कॅन्डल मार्च चा व्हिडिओ
डॉक्टरांच्या या आंदोलनास काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री ते पाटील यांनीही भेट दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की या घटनेतील नराधमास फाशी देण्यात यावी.
आय एम ए चे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी म्हणाले की, महिला वरील हल्ले वाढत गेले, तर समाजात काम करीत असणाऱ्या सर्व क्षेत्रातील महिला घरातून बाहेर पडणार नाहीत. अशा प्रतिक्रमे विचारसरणीला रोखण्याची आवश्यकता आहे या कठोर शासन व्हायला हवे.
आय.एम.ए. च्या महिला विभाग अध्यक्षा डॉ. अपर्णा पुरोहित म्हणाल्या की, कोलकत्ता मध्ये घडलेली घटना कोणाही बाबतीत घडू शकते. यासाठी मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यायला हवेत.
शेवटी सचिव डॉ. रोहन ठाणेदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.