Sangli Samachar

The Janshakti News

कोयत्याने वार करून सांगलीतील कबड्डीपटूची निर्घृण हत्या, पाच अल्पवयींना घेतले ताब्यात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ ऑगस्ट २०२४
हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये झालेल्या किरकोळ वादावादीचा राग मनात धरून सांगली शहरातील गजबजलेल्या जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ कबड्डीपटू अनिकेत तुकाराम हिप्परकर या तरुणाचा डोक्यावर कोयत्याने वार करून पाच अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली.

अनिकेत हिप्परकर हा येथील एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करतो. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळातही तो सक्रिय आहे. विविध कार्यक्रमात त्याचा मोठा सहभाग असतो. 23 एप्रिल 2024 रोजी साजऱ्या झालेल्या हनुमान जयंती कार्यक्रमात त्याचा येथील तरुणांशी वाद झाला. यावेळी हिप्परकर याने एका तरुणाच्या कानशिलात लगावले होती. हा राग या तरुणासह त्याच्या मित्रांमध्ये होता.


काल संध्याकाळी पाचच्या सुमारास अनिकेत हिप्परकर जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ उभा होता. त्यावेळी कानशीलात लगावलेल्या तरुणांसह काहीजण तेथे आले आणि त्यांनी अनिकेतला पूर्वी झालेल्या घटनेबाबत छेडले. यावरून अनिकेतचा व या तरुणांचा पुन्हा जोरदार वाद झाला यातूनच दोघा संशयित तरुणांनी अनिकेतवर कोयत्यांनी सपासप वार केले. ते वार वर्मी बसल्याने अनिकेत आता त्याच्या थरोळात कोसळल्यानंतर संशयित मुले पसार झाली.

सदर घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळताच, उपअधीक्षक जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे, एलसीबी चे निरीक्षक सतीश शिंदे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून काही पथके संशयतांच्या शोधासाठी पाठवली आणि अवघ्या काही तासातच या तरुणांना ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.