| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
सांगली महापालिका ते मध्ये 1986 सालापासून 26 दिवस काम करणारे बदली कामगार आहेत मग त्यांना बदली कामगार कसे म्हणणार ही बाब मंत्रालय स्तरावर आमदार गोपीचंद पडळकर व भाजप नेते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यानंतर मंत्रालय स्तरावरून सांगली महापालिकेकडून फेर प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप नेते व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.
यावेळी बोलताना आ. पडळकर म्हणाले की, खरंतर हे बदले कामगार प्रत्येक नैसर्गिक आपत्तीवेळी जीव धोक्यात घालून काम करीत असतात त्यामुळे या कर्मचाऱ्यांची जबाबदारी राज्य सरकार व महानगरपालिके प्रमाणेच लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही आहे. असे सांगून जोपर्यंत तर कायम होत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील अशी ग्वाही दिली. बदली कामगारांचा जिव्हाळ्याचा प्रश्न शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी आ. गोपीचंद पडळकर यांच्यामार्फत मंत्रालयापर्यंत पोहोचवल्याबद्दल उपस्थित बदली कामगारांनी दोघांचेही आभार मानले.
यावेळी आंदोलकांना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी बदली कामगारांचा रोजंदारी कर्मचारी म्हणून फेर प्रस्ताव दाखल करीत असल्याचे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर व शिवाजी डोंगरे यांच्यासह शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आता बदली कामगारांचा प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.