yuva MAharashtra सांगलीत कृष्णा नदी पाणी पातळी स्थिर, नदीकाठच्या नागरिकात समाधानाचे वातावरण !

सांगलीत कृष्णा नदी पाणी पातळी स्थिर, नदीकाठच्या नागरिकात समाधानाचे वातावरण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑगस्ट २०२४
सांगली, कोल्हापूर, सातारा धरण व नदी पाणलोट क्षेत्रात सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीला धोका पातळीचा इशारा देण्यात आलेला होता. परंतु आज संध्याकाळी 4.30 पर्यंत सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 39. 9 इतकीच स्थिर होती. उलट पक्षी कराड, भिलवडी, डिग्रज या ठिकाणची पाणी पातळी कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

हवामान तज्ञाकडून अतिवृष्टी आणि धोक्याच्या पातळीचा इशारा देणे नदीकाठ धास्तावला होता. तर जलतज्ञांकडून मात्र कोणत्याही परिस्थितीत कृष्णा नदी पातळी 42 फुटाच्या वर जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता. सध्या तरी सांगली आयर्विन पुला जवळची पाणी पातळी चाळीस फुटाच्या आत असल्यामुळे, 48 तासांपैकी पुढील 24 तासाच्या प्रतीक्षेत आहेत.

*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका*
महापालिका मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष
🌊*वॉर रुम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष)* 🌊

*दिनांक - 2 ऑगस्ट, 2024 वेळ - सायं.4.30 वाजता*

*🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 39 फुट 9 इंच*
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट

*🌊 कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी 52 फुट 8 इंच*
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 45 फूट व धोका पातळी 57 फूट

*📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक* 
7066040330 / 7066040331 / 7066040332
                     
मदत व बचावकार्य कक्ष                                                                                           
🚒 अग्निशमन दल 🚒 *📞संपर्क क्रमांक*
टिंबर एरिया, सांगली - 0233-2373333
स्टेशन चौक, सांगली -0233-2325612
कमानवेस, मिरज - 0233-2222610