| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑगस्ट २०२४
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये पथविक्रेत्यासाठी पी. एम. स्वानिधी योजना राबविण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत "स्वानिधी से समृध्दी" हा उपक्रम घेण्यात येतो.
केंद्र स्तरावरुन घेण्यात आलेल्या "RRAISE AWARDS 2023-24" करिता सांगली महानगरपालिका 'स्वानिधी से समृध्दी' या उपक्रमामध्ये अव्वल आली असून, बेस्ट परफॉर्मन्स पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त मा. शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पी. एम. स्वानिधी) या योजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी सुरू आहे. योजनेअंतर्गत शहरातील 9847 पथविक्रेत्यांना 10 हजार रु. प्रमाणे 9 कोटी 84 लाख 70 हजार रुपये इतक्या रकमेचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच 2533 पथविक्रेत्यांना 20 हजार प्रमाणे 5 कोटी 6 लाख 60 हजार रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. तसेच 735 फेरिवाल्यांना 50 हजार प्रमाणे 3 कोटी 67 लाख 50 हजार रुपयाचे कर्ज वितरित केले आहे.
योजनेअंतर्गत 10 हजार, 20 हजार व 50 हजार रुपयाचे कर्ज तीन टप्पामध्ये वितरित करण्यात येत आहे, महानरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना आत्तापर्यंत एकूण 18 कोटी 58 लाख 80 हजार रुपयाचे कर्ज बँकेमार्फत वितरित करण्यात आले आहे.
10 हजार रुपयाचे कर्ज ज्या लाभार्थ्यांला मिळाले आहे. असे सर्व लाभार्थी "स्वानिधी से समृध्दी " या उपक्रमासाठी पात्र ठरतात.
या उपक्रमामध्ये पी. एम. सुरक्षा विमा योजना, पी. एस. जीवन ज्योती विमा योजना, पी. एम. श्रम योगी मानधन योजना, पी. एम. जनधन योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, जननी सुरक्षा योजना, Regostrations imder BOCW, पी. एम. मातृ वंदना योजना अशा आठ इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो. तसेच पी. एम. स्वानिधी योजनेअंतर्गत 7061 पथविक्रेते डिजीटल ॲक्टिव्ह झाले असून, QR कोडद्वारे ऑनलाईन व्यवहार करीत आहेत.
या सर्व कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने PRAISE award 2023-24 साठी महानगरपालिकेची अव्वल क्रमांकाने निवड करुन गौरवण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त मा. शुभम गुप्ता व उपायुक्त मा. शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अभियान व्यवस्थापक मतिन अमिन, किरण पाटील, ज्योती सरवदे व सर्व समूह संघटक यांनी या योजनची यशस्विरित्या अंमलबजावणी केली आहे.