Sangli Samachar

The Janshakti News

संभाव्य महापुराबाबत सांगली कोल्हापूरच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सुनील फुलारे यांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑगस्ट २०२४
सांगली सह कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्वच नद्यांना अतिवृष्टीमुळे महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येत असल्यामुळे, नागरिकांनी घाबरून न जाता या आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी सामना करूया, प्रशासन व पोलीस यंत्रणा तुमच्यासाठी सज्ज असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

सांगलीतील आयर्विन पूल, मगरमच्छ कॉलनी यासह पूर भागाची पाहणी करून महानिरीक्षक फुलारी यांनी आढावा घेतला. यावेळी मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुनील फुलारी म्हणाले की सांगली कोल्हापूर परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. एनडीआरएफ, लष्कराचे जवान, जिल्हा प्रशासन महापालिका आणि पोलीस यंत्रणा हातात हात घालून 24 तास महापुरावर लक्ष ठेवून आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जात आहे. सध्या पूर परिस्थिती नियंत्रणात असून पुराशी मुकाबला करण्यास सक्षम आहोत. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. विशेषतः तरुणांनी सेल्फीच्या नदात आपला युज होक्यात घालू नये असे आवाहन सुनील फुलारे यांनी यावेळी केले. नागरिकांनी सुरक्षित स्थळावरून प्रशासनाच्या सल्ल्याशिवाय घरी परतण्याची घाई करू नये असेही सुनील फुलारी यांनी म्हटले आहे.