| सांगली समाचार वृत्त |
पाटणा - दि. ११ ऑगस्ट २०२४
अफू, गांजा, एखाद्या जडजवाहाराची किंमत कोट्यावधी रुपयांची चोरटी वाहतूक करणारी टोळी पोलिसांनी पकडल्याचे आपण नेहमीच वाचतो, ऐकतो. परंतु बिहार पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये, साडेआठशे रुपये किमतीचा ऐवज जप्त केला तोही एका बोटभर असलेल्या डबीतून.
याबाबत अधिक माहिती अशी की भांडी घासण्याच्या काथ्याप्रमाणे वाटणारा एक पदार्थ बिहार पोलिसांनी तिघांकडून जप्त केला. परंतु हा पदार्थ साधासुधा नाही. याचं नाव कॅलिफोर्नियम असं आहे. हा एक रेडिओॲक्टिव्ह किरणोत्सर्गी करणारा पदार्थ आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बिहार पोलिसांनी कुच्चाईकोट पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या बलथारी भागामध्ये छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीस खाक्या दाखवताच, आरोपींनी आपल्याकडील एक छोटीशी बोटभर उंचीची डबी काढून पोलिसांच्या हातावर ठेवली. ज्यामध्ये हा किमती पदार्थ होता.
यानंतर पोलिसांनी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीशी संपर्क साधून या पदार्थाची पाहणी करण्यासाठी तज्ञांना पाठवण्याची मागणी केली. तेव्हा तज्ञांनी केलेल्या पाहणीनुसार तो पदार्थ कॅलिफोर्नियमच असल्याचे सिद्ध झाले. आता पोलीस सदर आरोपींनी हा किमती पदार्थ कुठून हस्तगत केला, आणि तो कोठे घेऊन जात होते, याची माहिती घेत आहेत.
कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 50 ग्रॅम कॅलिफोर्नियमची किंमत तब्बल साडेआठशे कोटी रुपये इतके असून, तो सर्वसाधारणपणे अशारीतीने कोणाच्याही हाती लागत नाही. याबाबत अधिक माहिती घेता असे समजले की, सर्वप्रथम 150 साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठांमध्ये प्रयोगशाळेत याची निर्मिती करण्यात आली. तेव्हा याच राज्याचे नाव या पदार्थाला देण्यात आलं. हा पदार्थ प्रामुख्याने शस्त्रामध्ये वापरला जातो. या आरोपींच्या हाती तो कसा लागला ? हा पोलिसांनाही पडलेला प्रश्न आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.