Sangli Samachar

The Janshakti News

भेट नाकारल्याने धाराशिवमध्ये मनसे, मराठा आंदोलकांमध्ये राडा, राज ठाकरे यांचा दौरा मराठवाडा अडचणीत !


| सांगली समाचार वृत्त |
धाराशिव - दि. ६ ऑगस्ट २०२४
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणा विरोधात उघड भूमिका घेतल्याने, मराठा आंदोलक आक्रमक झाले असून, महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांचा धाराशिवमधील पुष्पक पार्क या ठिकाणी मराठा आंदोलकांनी मोठा राडा केला. राज ठाकरे यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेचा जाब विचारण्यासाठी तेथे काही मराठा आंदोलन पोहोचले. त्यावेळी त्यांना सुरक्षारक्षकांनी मनसे कार्यकर्त्यांनी रोखल्याने हा राडा झाला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्याची आखणी केली आहे. पहिल्या टप्प्यात ते मराठवाडा दौऱ्यावर असून यासाठी ते धाराशिव येथे पोहोचले. ज्या पुष्पक पार्क येथे ते मुक्कामाला आहेत, तेथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट मागितली. सुरुवातीस राज ठाकरे यांनी त्याला मान्यताही दिली. परंतु सुरक्षतेच्या कारणावरून नंतर ही भेट नाकारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी तेथेच ठिय्या मारला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जयजयकाराने घोषणेने परिसर दणाणून सोडला.


त्यामुळे आता राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा अडचणीत येतो की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत असून, पुढील महाराष्ट्र दौऱ्यावर ही प्रश्नचिन्ह उमटले आहे. दौऱ्यातील प्रत्येक ठिकाणीच मराठा आंदोलकांनी अशा पद्धतीने राडा करण्यास सुरुवात केली तर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या दौऱ्यास परवानगी नाकारले जाऊ शकते. भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना अडवणे शक्य होणार आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.