| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांच्या हस्ते महापालिका आवारात ध्वजारोहण करण्यात आले.
यानिमित्त महापालिका आवारात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात महापालिकेच्या कर भरणा करणाऱ्या नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच तंबाखू विरोधी शपथ ही यावेळी घेण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे संचालन पार पडले.
आयुक्त मा. शुभम गुप्ता यांचे मनोगत !
यावेळी अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन जवानांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर बोलताना आयुक्त शुभम गुप्ता यांनी आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाबरोबर नागरिकांची आहे. त्यामुळे आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी एकत्र आले पाहिजे. आपले शहर स्वच्छ ठेवणे हा एकमेव उद्देश आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.
यावेळी बोलताना शुभम नृत्य म्हणाले की, महापालिका प्रशासनाकडून अनेक विकासात्मक कामे ही सुरू असून, नागरिकांना लागणाऱ्या आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याचे काम महापालिका प्रशासन व आमचे सर्व अधिकारी करत आहेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपयुक्त वैभव साबळे, संजीव ओहोळ शिल्पा दरेकर, शहरापर्यंत पृथ्वीराज चव्हाण मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुरणे, आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर रवींद्र ताटे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, अनिस मुल्ला, विद्या घुगे , सचिन सागावकर, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत सादर केले तर महापालिका शाळा क्रमांक एक व कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी झेंडा गीत सादर केले.
सूत्रसंचालन अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी केले.