| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० ऑगस्ट २०२४
मिरज येथील अशोक कांबळे उर्फ आसिफ मोहम्मद नदाफ या हमालाचा मुंबईतील जुन्या मडगाव रेल्वे स्थानकाजवळ पोटात बाटली खूपसून देण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. संशयित आरोपीचे नाव सुरेश सिंग सोनार (रा. फोंडा गोवा, मूळ नेपाळ) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मिरज येथील अशोक कांबळे उर्फ असे मोहम्मद नदाफ हा जुन्या मडगाव रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करतो. तेथे असलेल्या संशयित सुरेश सोनार आणि अशोक कांबळे यांच्या सोमवारी काही कारणास्तव वाद झाला. वादाचे पर्यावरण जोरदार हाणामारीत झाले. यावेळी सोनार याने अशोकच्या पोटात आपल्याजवळ धारदार बाटली खूप सोन्याची हत्या केली व तो पसार झाला.
पोलिसांना याची खबर मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व सुरेश सोनार याला मुंबई येथून अटक केली. कांबळे व सोनार यांच्यामध्ये नेमके कोणत्या कारणास्तव भांडण झाले याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.