Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत कोसळधार तर महाबळेश्वर खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, सर्वत्र पाणीच पाणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑगस्ट २०२४
आठवडाभराच्या उसंतीनंतर काल पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. सांगलीत अचानकपणे जवळजवळ तासभर धुवाधार बॅटिंग केली त्यामुळे शहरातील सखल भागात पाण्याने शहरवासीयांची दाणादाण उडाली. शिवाजी मंडई, मारुती रोड, झुलेलाल चौक, स्टेशन रोड, वखार भाग आधी ठिकाणच्या रस्त्यावर पाण्याने वाहन चालकांचे मोठे तारांबळ उडाली.

सांगली शहर जवळपास संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. परंतु महाबळेश्वर खोऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. दरम्यान या परिसरातील सावित्री नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे
 रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पायथा कापडे परिसरात मुसळधार पाऊस झाला. साताऱ्यातही पावसाने वीज कडकडाटासह हजेरी लावली. पुण्यातील आंबेगाव पठारावर जोरदार पाऊस झाल्याने, या ठिकाणी पूर्ण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. 

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी राजांना मात्र दिलासा मिळाला आहे. बऱ्याच ठिकाणची पेरणी झाल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. सध्या राज्यात वार्षिक पाऊस मानाच्या सरासरी 93% इतका पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरण 90% पेक्षा अधिक भरल्याने, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कृष्णा कोयना नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकासाठीची तर नागरिकांची पुढील वर्षभरात पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात मात्र अवघे 30 टक्केच पाणी शिल्लक आहे. या धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची आवश्यकता आहे.