yuva MAharashtra सांगली कॉलेज कॉर्नरजवळ भरचौकात तरुणीवर पूर्ववैमनस्यातून पतीनेच केला हल्ला !

सांगली कॉलेज कॉर्नरजवळ भरचौकात तरुणीवर पूर्ववैमनस्यातून पतीनेच केला हल्ला !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑगस्ट २०२४
येथील सांगली कॉलेज कॉर्नर जवळ येईल नेहमी गजबजलेल्या चौकात सकाळी साडेआठच्या सुमारास एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याने मोठे खळबळ माजली. या जखमी तरुणीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तरुणीवर झालेला हा बहुचर्चित हल्ला, तिच्याच पतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या तरुणीचे अवघ्या सहा महिन्यापूर्वी प्रांजल काळे हिचे संग्राम शिंदे या तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. परंतु अल्पावधीतच मतभेद झाल्याने ही तरुणी आपल्या माहेरी परतली होती. संग्राम शिंदे याने सातत्याने 'तू परत घरी ये' असा तगादा लावला होता. परंतु प्रांजल काळे हिने यासाठी नकार दिल्याने चिडून अखेर संग्राम शिंदे याने, आज सकाळी प्रांजल कॉलेजला जात असताना, कॉलेजच्या गेट जवळील चौकातच तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यापासून बचाव करताना प्रांजलच्या हातावर जोरदार वार झाले आहेत.


या घटनेनंतर संग्राम शिंदे हा पळून गेला. पोलिसांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पोलीस संग्राम शिंदे च्या मागावर गेले आहेत. या घटनेनंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकांकडून शहरातील सर्वच कॉलेज नजिक निर्भया पथकाची सातत्याने गस्त असावी अशी मागणी केली आहे.