yuva MAharashtra मागतो मी एक मित्र नक्षत्रासारखा... (✒️ राजा सांगलीकर)

मागतो मी एक मित्र नक्षत्रासारखा... (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २० ऑगस्ट २०२४
मी मराठी माणूस, मराठी माझी मातृभाषा, शालेय शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळमध्ये. शाळेत असतानाच मी राष्ट्रभाषा हिंदीची प्रविण परिक्षाही उत्तीर्ण झालो. त्यामुळे मराठी-हिंदी भाषेतील साहित्य वाचनाकडे माझा अधिक कल. पण कधीकधी इंग्रजी भाषेतील एखाद्या लेखाच्या, पुस्तकाकडे त्याच्या शिर्षकामुळे मी आकर्षिला जातो आणि तो लेख-पुस्तक वाचतो. तो लेख, पुस्तक, त्यात मांडलेले विचार, भाव, दिलेला संदेश चांगला वाटले की “वा, मस्त, आज एक छान लेख, पुस्तक वाचायला मिळाले हं” असा विचार मनात उमटतो. 

असाच एक अनुभव मला अलिकडेच जुई पुरोहित या अपरिचित कवियत्रिने लिहिलेल्या ‘वर्डस् बिकेम पोएट्री’ या इंग्रजी भाषेतील कविता संग्रहाबाबत झाला. कविता संग्रहाचे नांव ‘वर्डस् बिकेम पोएट्री’ - शब्द जे काव्य बनले, मला खूप काव्यमय वाटले. मनातील कुठल्यातरी कोप-याला स्पर्शून गेले. शब्द काव्य कधी बनतात, जेंव्हा कवितातून कवि आपल्या संवेदना प्रगट करतो त्यावेळी.

‘वर्डस बिकेम पोएट्री’ या काव्यसंग्रहातील कविता वाचताना कवियत्रीच्या संवेदना माझ्या मनाला खूप भावल्या. वाटले, कवितेतील हे जग माझ्या ओळखीचे आहे. माझ्या आजुबाजूच्या,
परिसरातील आहे. या परिसरात रोज घडणा-या घटना मी नेहमी डोळ्यांनी पाहातो, कानांनी ऐकतो आणि दृदयांने जाणतो. त्या घटनाप्रसंगी जे भाव मनात आले, येतात ते नेमके या कवितांच्या शब्दातून प्रगट झाले आहेत. या कविता इंग्रजी भाषेत असल्यामुळे सुरवातीला कांही शब्दांचा अर्थ मला समजला नाही. पण नंतर डिक्शनरीच्या सहाय्याने त्यांच्या अर्थाचे आकलन झाले आणि कवियत्रीने शब्दरूपाने मांडलेले भाव, संवेदना मला समजल्या. हे भाव, संवेदना मराठी भाषिक रसिकांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूने या संग्रहातील २१ कवितापैंकी कांही कवितांचे स्वैर भाषांतर केले
आणि त्यावर भाष्य लिहिले.


‘वर्डस् बिकेम पोयट्री’ - शब्द बनले काव्य. काव्यसंग्रहाचे नांवच काव्यमय आहे. कवि मनाला स्पर्श करत असते. या कवितात सौंदर्यपूर्ण, जड शब्द नाहीत. यात आहेत मनाला स्पर्श करणारे साधे, सरळ शब्द. सामान्य माणसांच्या मर्यादित जगात त्याच्या रोजच्या जीवनात, आजुबाजूच्या परिसरात, क्षणाक्षणाला घडणा-या घटना, प्रसंगावर या कविता बेतल्या आहेत. 

हे प्रसंग, घटना अशा आहेत, ज्या भावनाप्रधान, संवेदनशील माणसाच्या मनात प्रेम, माया, ममता, वैषम्य, नैराश्य, एकटेपण, क्रोध, वैराग्य, आनंद, सुख, समाधान, दुःख, उदासिनता, हताशता, बेचैनी उत्पन्न करतात. त्याच्या मनाला सुख, आनंद, दुःख, वेदनांच्या हिंदोळ्यावर झोके देतात, कधी त्याला उंच-उंच नेतात, तर कधी खाली खेचतात. असे हे शब्द जे कविता बनले आहेत ते मनाशी सुसंवाद साधतात. 

सुख, दुःख, आनंद, वेदनांच्या हिंदोळ्यावर सतत झोके घेणा-या मनातील विचारांना चालना देतात आणि विचार करायला प्रवृत्त करतात. एकवीस कविता असलेल्या या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेत मला काय आवडले हे सांगायचे
म्हंटले तर एक स्वतंत्र पुस्तक होईल. कारण प्रत्येक कवितेत मला आवडलेले, विचारांना चालना देणारे कांही ना कांही तरी आहेच आहे. मराठी भाषिक वाचकांसाठी या काव्यसंग्रहातील कांही निवडक कवितांचे मी मराठी भाषेत केलेले स्वैर भाषांतर व त्यावरील भाष्य मी दिले आहे.

१. Friends forever- चिरंतन मित्र
जीवनातील कठीण प्रसंगी आपल्याला समजून घेणारा, नैराशेतुन बाहेर पडण्यास सहाय्य करणारा, आधार देणारा, आपले चुकले तरी सांभाळून घेणारा आणि ज्याच्यापुढे आपले मन आपण मोकळे करू शकतो असा सच्चा, जवळचा एक मित्र आपल्याला असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. ही कविता अशाच मित्राचे वर्णन करत आहे.

कविता भाषांतर...

“मदतीचा हात पुढे करत, निःस्वार्थ स्नेहबंध जोपसत जाणून अबोलता माझी, 
सार आस्था, स्नेहाचे खिन्न उदास माझ्या रात्री, घट्ट मिठीत मजला घेत ओघळता मम गालावर अश्रू, 
लगेच उत्सुकतेने पुसत ऐकून माझी गा-हाणी, मोकळे होण्याची देतो मुभा करताना 
साजरे यश माझे, करतो शिडकावा सुगंधाचा, 
हे ठीक ते नाही ठीक समजावत, संकटासाठी तयार करतो मला शिरा ताणूनी मी ओरडते,
शांतपणे ऐकून घेतो तो फालतु बडबड माझी, समजुन-उमजुन दुरुस्त करी तो

मागतो मी एक मित्र नक्षत्रासारखा...
अन्य काय मी मागू”