| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑगस्ट २०२४
सांगलीतील प्रसिद्ध वास्तुरचनाकार प्रमोद चौगुले यांना वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीतर्फे सामाजिक कार्याची दखल घेऊन ऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. निसर्ग, पर्यावरण संवर्धन, वृद्ध निराधारांसाठीचे कार्य, रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया कडून आपत्कालीन सेवा कार्य, यासाठी ही डॉक्टर पदवी देण्यात आली आहे.
गोवा येथे ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ बोस्टनचे प्रेसिडेंट संजीवकुमार बानिक यांच्या हस्ते हा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. या दीक्षांत समारंभासाठी युरो एशियन युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. ललितकुमार सेवास्टीयन मेंडेस, व्यंकटेश्वरा मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ललित कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमोद चौगुले हे सांगलीतील वास्तुरचनाकार असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल यापूर्वीही अनेक संघटनांनी घेतलेली आहे. विशेषतः पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाचे त्यांचे कार्य अलौकिक म्हणायला हवे. अनेक सामाजिक कार्यामध्येही ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांना वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीतर्फे मिळालेल्या ऑनररी डॉक्टरेट बद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनचा वर्षाव होत आहे.