yuva MAharashtra राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा व सांगली जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने शहरजिल्हाध्यक्ष उउश्री. संजय बजाज तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. देवराजदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुती सरकाराचा काळे फुगे व दहीहंडी फोडून प्रतिकात्मक निषेध नोंदवत दहीहंडी साजरी करण्यात आली.

महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार राज्याचा विचार करण्याऐवजी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी दिलेल्या तुकड्यावर समाधानी राहून उघड्या डोळयांनी आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्राचा देशातील क्रमांक खाली घसरताना पाहणारे हे महायुतीचे सरकार आहे.

राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार, आमदार लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, विधानपरिषदेमध्ये जीवाचे रान करून प्रश्न मांडत असताना महायुतीचे विद्यमान खासदार आणि आमदार हे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मश्गुल दिसत आहेत.


महाराष्ट्राच्या हक्काच मागताना यांची तोंडे उघडत नाहीत, पण इथले हक्काचे उचलून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत होत असताना देखील मूग गिळून बसणारी प्रवत्ती राज्यात वाढत आहे. 
महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी कार्य करण्याऐवजी राज्याच्या अधोगतीसाठी वापर होईल असे विषय प्रसारमाध्यमांवर मुद्दामपणे आणून महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहचविण्याचे काम महायुतीमधील नेते मंडळी करीत आहेत.

 ही महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बाब आहे, तसेच शेतकरी, युवक, महिला तसेच समाजातील विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध यावेळी करण्यात आला.

तसेच काल मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबतच्या घटनेचा निषेध करत, सदर घटनेबाबत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी ची मागणी यावेळी करण्यात आली 

याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा व सांगली जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने महायुती सरकारचे काळे कारनामे असे आशय असणारे फुगे फोडून तसेच दहीहंडी फोडून प्रतिकात्मक निषेध नोंदवत दहीहंडी साजरी करून आंदोलन करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हा (ग्रामीण) जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, शहरजिल्हा युवक अध्यक्ष राहुल पवार, सचिन जगदाळे, हरिदास पाटील, उत्तम कांबळे, सागर घोडके, समीर कुपवाडे, ज्योती अदाटे, लता माने, किसन जानकर यांच्यासह सांगली जिल्हा सर्व आजी माजी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.