| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
महापालिकाला लाभलेले भा. प्र. से. दर्जाचे आयुक्त शुभम गुप्ता हे महापालिकेला शिस्त लावून, आणि इतर मार्गानेही बचत करू पाहत आहेत. नुकत्याच महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या विविध कामांमधून महापालिकेस 20 लाख रुपयांची बचत झाल्याची बातमी आली. पण महापालिकेला वर्षाला तब्बल 11 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपुरवठा विभागातील वार्षिक खर्च 35 कोटींचा आहे. मात्र या विभागाची वसुली 24 कोटी होते. त्यामुळे या विभागाकडून अकरा कोटी रुपयांचा तोटा महापालिकेला सहन करावा लागत आहे.
महापालिकेतर्फे जे पाणी उपसा केले जाते आणि त्यानंतर जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते त्याचे बिल वजा जाता 29 कोटी 78 लाख रुपये बिल येणे अपेक्षित आहे. मात्र पाणीपुरवठा विभागाची वार्षिक मागणी 21 कोटी 30 लाखांची आहे. यातून सुमारे आठ कोटी 48 लाखांची पाणी आकारणी ही बिलाबाहेरची असल्याचे सांगितले जाते. . आता ही गळती रोखायची असेल तर जनतेच्या हिताचे ध्येय ठेवून रुजू झालेल्या आयुक्त शुभम गुप्ता यांनी याकडे लक्ष देण्याचे गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.