yuva MAharashtra सांगलीकरांच्या नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करा, आयुक्तांकडे पृथ्वीराज पाटील यांची मागणी !

सांगलीकरांच्या नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करा, आयुक्तांकडे पृथ्वीराज पाटील यांची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑगस्ट २०२४
महापालिका हद्दीतील नागरी समस्यांने नागरिक हैराण झाले आहेत. समस्याग्रस्त भागात नागरिकांना समक्ष भेटून संवाद साधला त्यावेळी त्यांचा संताप व्यक्त झाला असे सांगून पृथ्वीराज यांनी समस्यांचा आयुक्तासमोर पाढाच वाचला.

प्रभाग ८ मध्ये ड्रेनेज खोदाई मुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करणे, काढलेल्या कचरा कुंड्या पूर्ववत ठेवणे, डासप्रतिबंधक औषध फवारणी करणे. वार्ड नं.११ मधील विकासनगर मध्ये रस्ते, लाईट, दसरा चौक ते दुर्गामाता मंदीर गटर बांधकाम करणे, वार्ड नं. १२ मध्ये शिंदे मळा ते रेपे प्लाॅट रस्ता दुरुस्ती, गटर बांधकाम, लक्ष्मीनगर दगडे प्लाॅट रस्ता करणे व डुकरांचा बंदोबस्त करणे, वार्ड नं.१७ मध्ये दत्तनगर ड्रेनेज लाईन टाकणे, कुमठे मळ्याच्या पाठिमागे प्लाॅटवर पाणी साचण्याची समस्या निराकरण करणे, पुरेशा दाबाने स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी टाळी बांधणे, अर्धवट बांधकाम झालेला स्केटिंग ट्रॅक पूर्ण करणे, उद्यान उभारणी करणे, प्रभाग क्र.१ वसंतनगर मधील ड्रेनेज खोदाई पूर्ण करुन रस्ते दुरुस्त करणे, नियमितपणे गटर स्वच्छता, प्रभाग क्र.१५ मध्ये पत्रकार नगरातील मोकळे प्लाॅट स्वच्छता व मा. आयुक्त बंगल्या समोरच्या आप्पासाहेब पाटील नगरमध्ये नाना नानी पार्क संरक्षक भिंत बांधून लाईट पाण्याची सोय करणे इ. समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात यावेत अशी आग्रही मागणी पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्तांना समक्ष भेटून केली. 


या प्रकरणी उपाययोजना करण्यात येईल असे मा. आयुक्तांनी आश्वस्त केले. यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते. चर्चेत अजय देशमुख, सनी धोतरे यांनी सहभाग घेतला. यावेळी आयुब निशाणदार, आयुब निशाणदार, प्रफुल्ल यादव, सागर चिखले, शाबाझ नायकवडी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते