yuva MAharashtra सांगली महानगरपालिकेकडून वाहनांची तिरंगा वाहन रॅली संपन्न !

सांगली महानगरपालिकेकडून वाहनांची तिरंगा वाहन रॅली संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
 सांगली - दि. १४ ऑगस्ट २०२४
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी सांगली शहरातून आपल्या सर्व वाहनांची तिरंगा वाहन रॅली काढण्यात आली. मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्याहस्ते आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत निशाण दाखवत तिरंगा वाहन रॅलीला सुरुवात करण्यात आली.  

या तिरंगा वाहन रॅलीमध्ये महापालिकेकडे असणाऱ्या सर्व प्रकाराच्या वाहनांना सहभागी करण्यात आले होते. सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथून ही तिरंगा वाहन रॅली विश्रामबाग पर्यंत नेण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त विद्या घुगे, अनिस मुल्ला, सचिन सागावकर , आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी सुनील माळी, उद्यान अधीक्षक वैभव वाघमारे, कार्यशाळा विभाग प्रमुख तेजस शहा, विनायक जाधव, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारागिर, अनिल पाटील, याकूब मद्रासी यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या तिरंगा वाहन रॅलीसाठी महापालिकेची सर्व वाहने तिरंगा थीमने सजवण्यात आली होती. 


त्यानंतर प्रभाग 3 मधील वाहनांनी कुपवाड तर प्रभाग 4 मधील वाहनांनी मिरजेतून वाहन रॅली काढत स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त केला. तसेच आज संध्याकाळी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे तिरंगा सांस्कृतिक महोत्सव होत आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.