Sangli Samachar

The Janshakti News

देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल तीनशे बँकांना फटका ? सर्वत्र एकच खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ ऑगस्ट २०२४
देश परदेशात हॅकर्स नेहमीच सायबर अटॅक करीत असतात. यामधून अगदी एखाद्या देशाची संरक्षण यंत्र नाही सुटत नाही. त्याचप्रमाणे सर्वसामान्य ग्राहकांना तर सायबर हॅकर्स नेहमीच धोका असतो. विविध माध्यमातून नागरिकांना लुटण्याचे अनेक प्रकार समोर येतात.

सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या कंपनीवर मोठा सायबर हल्ला झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. 


या सायबर अटॅक मुळे स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या काही कंपन्यांवर सायबर अटॅक झाल्याने याचा फटका देशातील तीनशे मोठ्या बँकांना बसला आहे. स्टेट बँक इंडिया आणि टीसीएसच्या संयुक्त उपक्रम असलेल्या सी-एज टेक्नॉलॉजी या कंपनीवर सायबर अटॅक झाल्याने या कंपनीवर अवलंबून असलेल्या सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे अशी माहिती मिळाली आहे. अर्थात सी-एज टेक्नॉलॉजीच्या व्यतिरिक्त इतर बँकिंग सेवा सामान्यपणे कार्यरत आहेत.

कोणत्याही कॅस्केडींग प्रभावापासून बचाव करण्यासाठी सुमारे 300 लहान बँकांना देशाच्या व्यापक पेमेंट नेटवर्क पासून वेगळे केले आहे. असे नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले आहे त्यामुळे सी-एज ची सेवा घेणाऱ्या घेणाऱ्या बँकांचे ग्राहक आय सोल्युशन च्या काळात पेमेंट सिस्टीम वापरू शकणार नाहीत अशी माहिती देखील नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने दिली असल्याने खातेदारांच्या चिंता वाढल्या आहेत. आता प्रभावित झालेली बँकांची सिस्टीम, व्यवस्थित झाल्यानंतरच संबंधित बँकांच्या ग्राहकांना पेमेंट सुविधा उपलब्ध होणार आहेत.