| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या प्रदूषणाला नियंत्रण घालण्यासाठी भारत सरकारने सीएनजी आधारित वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. ग्राहकही पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी वाहने परवडत असल्यामुळे भारतात सीएनजी वाहनांना मोठी मागणी वाढत आहे. परंतु ज्या कारणामुळे सीएनजी वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे तो प्रदूषणाचा मुद्दा या वाहनांना लागू होतो का असा प्रश्न नव्या संशोधनाने निर्माण झाला आहे..
सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वाहने. ही वाहने पेट्रोल डिझेलच्या तुलनेत कमी वायू प्रदूषण करतात असे आजपर्यंत मांडले जात होते. इंटरनॅशनल कौन्सिल ऑन क्लीन ट्रान्सपोर्टेशन (ICCT) च्या एका अहवालानुसार सीएनजी वाहनामुळे आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक प्रदूषण होत असते असे म्हटले आहे. पियूसी चाचणीत उत्तम रिझल्ट असूनही अनेक वाहने अजूनही त्यांच्या उत्सर्जन मानकांपेक्षा जास्त प्रदूषण करीत असतात यामुळे खास करून दिल्ली यांचे आजचे भाग यामुळे प्रभावित होत आहेत. धुराचे लोट सोडणाऱ्या सुद्धा प्रदूषण वाढत आहे विश्वस्त हा हिवाळ्यात ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते.
आयसीसीटी विभागाने रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या चाचणीत, वाहनांचे उत्सर्जन मोजले असता प्रयोगशाळेमधील चाचणी मपेक्षा रस्त्यावरील वाहनांमधून होणारे उत्सर्जन अधिक नोंदवण्यात आले. या अभ्यासात असे नोंदवण्यात आले आहे की सीएनजी वाहने नायट्रोजन ऑक्साईडच्या हाय लेवल वर उत्सर्जन करीत आहेत. आतापर्यंत सीएनजी वाहनाना सर्वात क्लीन फ्युएल म्हणून दर्जा मिळाला होता, तो नव्या संशोधनाने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पेट्रोल डिझेलच्या तुलनेत खरंच सीएनजी वाहने प्रदूषणमुक्त आहेत का ? धक्कादायक खुलासा !