| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ ऑगस्ट २०२४
गेले चार दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून आज पासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे शनिवार आणि रविवारी पावसाचा हा जोर मोठ्या प्रमाणावर असू शकतो अशी शक्यता वर खात्याने वर्तवली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज तर ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी कमी पाऊस होता तेथेही समाधानकारक पावसाची शक्यता आहे.
जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे नोंद झाली आहे अनेक ठिकाणी तर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती राज्यातील सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून उत्तर विदर्भ उत्तर मराठा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत हवामान खात्याच्या इशारानुसार महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस कोसळदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज कलरची सूचना मिळाल्याने, कृष्णा वारणा पंचगंगा नदीकाठ पुन्हा एकदा धास्तावला आहे. परंतु तज्ञांच्या म्हणण्यानुसार, यानंतर नदीकाठ परिसराचा विध्वंस करणाऱ्या महापुराची शक्यता जवळपास नाहीच. धरणपरिक्षेत्रात जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला तरी आणि धरणातून विसर्ग करण्यात आला तरी सध्याची पाणी पातळी पाहता, हा महापूर इशारा पातळीच्या एका दुसऱ्या फुटापर्यंत वाढू शकतो, परंतु तो धोकादायक पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. तरीही 2019 चा अनुभव पाहता, नागरिकात महापुराबाबत भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
महापालिका मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष
🌊वॉर रुम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष)🌊
दिनांक - 1 ऑगस्ट, 2024 वेळ - दुपारी 2.30 वाजता
*🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 40 फुट 5 इंच*
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट
*🌊 कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी 53 फुट 2 इंच*
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 45 फूट व धोका पातळी 57 फूट
*📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक*
7066040330 / 7066040331 / 7066040332
मदत व बचावकार्य कक्ष
🚒 अग्निशमन दल 🚒 *📞संपर्क क्रमांक*
टिंबर एरिया, सांगली - 0233-2373333
स्टेशन चौक, सांगली -0233-2325612
कमानवेस, मिरज - 0233-2222610