yuva MAharashtra मराठ्यांच्या ठोक रॅलीनंतर शरद पवारांनी मांडली अटीसह सहकार्याची भूमिका !

मराठ्यांच्या ठोक रॅलीनंतर शरद पवारांनी मांडली अटीसह सहकार्याची भूमिका !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ ऑगस्ट २०२४
सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये टोकाची भूमिका घेतली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी शरद पवार यांची ताकद असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. अशावेळी ओबीसी संघटनांनी एकत्र येत एल्गार पुकारला आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण नाही म्हणजे नाहीच अशी भूमिका काल छगन भुजबळ यांनी मांडली. इतर नेत्यांनीही यावेळी शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की 50 टक्क्यांचे मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे अधिकार केवळ मोदी सरकारला आहे. राज्य सरकारला टार्गेट करून काही फायद्याचे नाही. त्यामुळे मोदी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आम्ही त्यांना जे हवे आहे ते सहकार्य करायला तयार आहोत. 


यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आज जे आंदोलन आले होते त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. आरक्षणाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मराठा आणि ओबीसी नेत्यांची बैठक बोलवण्याचे भूमिका मांडली आहे. गेले काही महिने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. त्यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित करावे, तसेच छगन भुजबळ यांनाही या बैठकीला बोलवावे असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तसे निकाल ही न्यायालयांनी दिलेले आहेत त्यामुळे आरक्षणाचे मर्यादा वाढवण्याचे भूमिका केंद्र सरकारने घ्यावी त्याला कोणताही विरोध न करता आम्ही पाठिंबा देऊ या पद्धतीने या समस्येवर तोडगा निघू शकतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे.