| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १२ ऑगस्ट २०२४
आज सकाळची गोष्ट. माझी नेहमीची सकाळची आन्हिके मी कधीच आवरली होती. व्यायाम करून झाला होता. वर्तमानपत्र; पहिल्या ओळीपासून ते हे वर्तमानपत्र यांच्या मालकीचे असून इथे छापले आहे इथपर्यंत वाचून झाले होते. सुनेने दिलेले दोन बशा मस्त उप्पीट, नाईसची बिस्कीटे आणि वाफळता चहा पिऊन पोटोबाही शांत झाले होते. घड्याळ साडेदहा वाजून गेल्याचे दर्शवत होते. आता पुढे काय करायचे ? कांही काम नाही. आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये खुर्ची टाकली. त्यावर मांडी ठोकली, (खुर्चीमध्ये मांडी घालून मला बसता येतं आणि आवडतही) कांहीतरी लिहावे असा विचार मनांत आला. काय लिहावं बरं? डोळे मिटून शांतपणे विचार करत बसलो.
शरीर स्थिर झाले पण मन व त्यात येणारे विचार थोडेच शांत होतात. पण हल्ली सवय झाली आहे, एकटं राहायची, आपल्याच विचारांकडे डोळे मिटून पाहायची. विचार येत होते, जात होते. येण्या-जाण्याचे त्यांचे आणि डोळे मिटून त्यांना पाहायचे माझे, दोन्ही कामे चालु होती. कांही वेळ असा गेला. कांहीतरी घडले होते. मला डोळे उघडावेसे वाटले. हळुवारपणे मी डोळे उघडले आणि पहिल्या श्वासापासून ते अंतीम श्वासापर्यंत जे मिळवण्यासाठी सर्वांची धडपड असते ती मखमली मुलायम वस्त्रासारखी आनंदाची भावना माझ्या मनांत प्रवेश करती झाली. कारण तो आला होता, तो ....
सुंदर शरीर आणि त्याहूनही सुंदर मनाचा, आपल्या येण्याने सर्वांचे मन प्रसन्न करणारा माझा छोटा मित्र, एक छोटे फुलपांखरू! पारदर्शक काळ्या, निळ्या, पांढ-या ठिपक्यांचे पंख, त्यावर जगातील कोणत्याही चित्रकाराला हुबेहुब चितरता न येणारी सुरेख नक्षी, केशरी-लाल रंगाचे शरीर, नाकाच्या शेंड्यावर पुढे टोके वळवलेल्या दोन मिशा, डोळ्यांचे टप्पोरे काळे ठिपके.... वॉssव!
बाल्कनीमध्ये ठेवलेल्या एका कुंडीतील एका झाडाच्या पानावर माझा तो सुंदर छोटा मित्र ऐटीत बसला होता, आजुबाजूच्या जगाचे भानविरहीत ‘ स्व ’ मध्ये मस्त. कांही वेळाने कधी या पानावर, तर कधी दुस-या पानावर, त्याचा मुक्त विहार सुरू झाला. मित्राला आनंदाने तसे विहार करतांना पाहुन माझ्या मनातही आनंदाचे कारंजे फुटले अन् माझे मन त्याच्या सहवासाचा, त्याच्या विहारण्याचा आनंद त्याच्यासोबत लुटु लागले.
कांही क्षण गेले. माझ्या मानवी मनामध्ये स्वार्थी विचार आला. या छोट्या मित्राला शब्दांत तर पकडता येत नाही पण याला आपण हाताने पकडूया, किमान खुर्चीच्या बाजूलाच ठेवलेल्या मोबाईलच्या व्हिडीओमध्ये तरी पकडूया. माझ्या मनातील ही स्वार्थी वासना माझ्या छोट्या मित्राने जाणली. आपले टप्पोरे काळे डोळे त्यांने माझ्यावर रोखले. डोळ्यांना डोळ्यांची भाषा समजली, हृदयाने हृदयाची भावना जाणली. माझ्या मनांत फेर विचार आला, मला जर कोणी असे चिमटीत पकडले, बंदिस्त केले, माझ्या स्वातंत्र्यावर रोख लावला तर मला आवडले कां? मी चरकलो, चुक लक्षात आली आणि मनाच्या लहरीतुन मित्राला संदेश दिला, ‘माफ कर मित्रा, माझे चुकले.’
मित्राच्या गालावर खुदकन हसू उमटले आणि अहो आश्चर्यम्, पानावरून तो जे थेट उडाला तो माझ्या गुडघ्यावर. माझ्याकडे पाहून स्मितहास्य करू लागला. माझ्या या छोट्या मित्राचे आगमन, त्याचा निरागसपणा, त्याचा स्वच्छंद विहार, माझे मन आनंदाने थुई-थुई नाचू लागले. जीवनातील खरा आनंद म्हणजे काय ते मला त्या क्षणाला समजले.
जगाचे भान विसरलेल्या त्या निखळ आनंदात कांही क्षण गेले. मित्राने आपले पंख पसरले आणि परत एक वेळ ते झाडाच्या दिशेने वळून बघता-बघता बाल्कनीतून बाहेर गेले. त्याच्या जाण्याने मी मनांतुन थोडा खट्टु झालो. पण तो परतला आणि माझ्या मनाला दिलासा देत म्हणाला, “मित्रा, तुला माहीती आहे कां, आम्ही फुलपांखरे मोजत नाही महिने पण मोजतो क्षण, आणि मिळवतो मुबलक वेळ.-१
माझा मित्र आपल्या आनंदी जीवनाचे रहस्य सांगतांना म्हणाला,
"भगवंताच्या कृपेने जगायला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद आम्ही लुटतो, इतरांनाही देतो. तू एकटा असतांना, किंवा तुला एकाकी वाटत असतांना, माझी मनांपासुन आठवण कर, मला साद दे आणि बघ मी परत येईन. मग आपण दोघेही सुंदर फुले पाहुया, पानांचे विविध रंग लुटुया, ढगांच्या आड लपून सुर्याच्या किरणांशी लपंडाव करूया, वा-याबरोबर पळण्याची शर्यत लावुया आणि लहान मुलासारखे बागडु, नाचुया, ..... खुप-खुप मज्जा करूया.”
आनंदी जीवनाचे गुपीत माझ्यापुढे उघडे करून माझ्या त्या छोट्या मित्रांने आपले पंख पसरले व हळुवारपणे तो निघुन गेला पण जाताना माझ्या विचारांचे पंख पसरवून गेला आणि हे पसरलेले विचार काव्यरूपाने उतरले.
एक आळी अंड्यातुन बाहेर आली
तिच्या मनाला येईल तसे वागू लागली
पाय फुटले काम-क्रोधाचे तिला
गुर्मीने नाही जुमाने कोणाला
दुष्ट विचारांचा कोश विणुन स्वतः भोवती
एक दुष्ट कुरूप किडा ती होती बनली
असाच कांही काळ गेला
आळीच्या अंतरंगात बदल झाला
कोश ‘स्व’ भोवतीचा आपोआप तुटला
तुटता कोश स्वरूप कुरूप किड्याचे बदलले
एक सुंदर फुलपांखरू, आकाशामध्ये विहारले
झोपेत पडले होते हे स्वप्न मला
अन् मी होतो बनलो ते फुलपांखरू
स्वप्न झोप संपली माणुस प्रगटला
परि विचार एक माझ्या मनी आला
स्वप्न कोणते ते की हे, खरे काय या क्षणाला
माझ्या छोट्या मित्रा, तुझ्या सहवासाने कांही क्षण तरी माझे रूपांतर फुलपांखरात झाले. खुप-खुप निखळ आनंद मिळाला. मित्रा तुझे खुप-खुप आभार.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
1. मुळ वचनः We butterfly counts not months but moments, and has time enough.- रविन्द्रनाथ टागोर
कविता आधारः I dreamed I was a butterfly, flitting around in the sky, Then I awoke; Now I wonder: Am a man who dreamt of being a butterfly or am a butterfly dreaming that I am a man? – Zhuangzi
कथा आधार वचनेः Metamorphosis are the greatest symbol of change for poets and artist. Imagine that you could be a caterpillar one moment, and a butterfly the next – Louie Schwartzberg
When I was angry, when I was younger, I was in a cocoon. Now, I am a beautiful, black beautiful. – Tracy Morgan
आभार एका छोट्या मित्राचे....
आज सकाळची गोष्ट. माझी नेहमीची सकाळची आन्हिके मी कधीच आवरली होती. व्यायाम करून झाला होता. वर्तमानपत्र; पहिल्या ओळीपासुन ते हे वर्तमानपत्र यांच्या मालकीचे असुन इथे छापले आहे इथपर्यंत वाचुन झाले होते. सुनेने दिलेले दोन बशा मस्त उप्पीट, नाईसची बिस्कीटे आणि वाफळता चहा पिऊन पोटोबाही शांत झाले होते. घड्याळ साडेदहा वाजुन गेल्याचे दर्शवत होते. आता पुढे काय करायचे? कांही काम नाही. आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये खुर्ची टाकली. त्यावर मांडी ठोकली, (खुर्चीमध्ये मांडी घालुन मला बसता येतं आणि आवडतही) कांहीतरी लिहावे असा विचार मनांत आला. काय लिहावं बरं? डोळे मिटुन शांतपणे विचार करत बसलो.
शरीर स्थिर झाले पण मन व त्यात येणारे विचार थोडेच शांत होतात. पण हल्ली सवय झाली आहे, एकटं राहायची, आपल्याच विचारांकडे डोळे मिटुन पाहायची. विचार येत होते, जात होते. येण्या-जाण्याचे त्यांचे आणि डोळे मिटुन त्यांना पाहायचे माझे, दोन्ही कामे चालु होती. कांही वेळ असा गेला.
कांहीतरी घडले होते. मला डोळे उघडावेसे वाटले. हळुवारपणे मी डोळे उघडले आणि पहिल्या श्र्वासापासुन ते अंतीम श्र्वासापर्यंत जे मिळवण्यासाठी सर्वांची धडपड असते ती मखमली मुलायम वस्त्रासारखी आनंदाची भावना माझ्या मनांत प्रवेश करती झाली. कारण तो आला होता, तो ....
सुंदर शरीर आणि त्याहुनही सुंदर मनाचा, आपल्या येण्याने सर्वांचे मन प्रसन्न करणारा माझा छोटा मित्र, एक छोटे फुलपांखरू! पारदर्शक काळ्या, निळ्या, पांढ-या ठिपक्यांचे पंख, त्यावर जगातील कोणत्याही चित्रकाराला हुबेहुब चितरता न येणारी सुरेख नक्षी, केशरी-लाल रंगाचे शरीर, नाकाच्या शेंड्यावर पुढे टोके वळवलेल्या दोन मिशा, डोळ्यांचे टप्पोरे काळे ठिपके.... वॉssव!
बाल्कनीमध्ये ठेवलेल्या एका कुंडीतील एका झाडाच्या पानावर माझा तो सुंदर छोटा मित्र ऐटीत बसला होता, आजुबाजुच्या जगाचे भानविरहीत ‘ स्व ’ मध्ये मस्त. कांही वेळाने कधी या पानावर, तर कधी दुस-या पानावर, त्याचा मुक्त विहार सुरू झाला. मित्राला आनंदाने तसे विहार करतांना पाहुन माझ्या मनातही आनंदाचे कारंजे फुटले अन् माझे मन त्याच्या सहवासाचा, त्याच्या विहारण्याचा आनंद त्याच्यासोबत लुटु लागले.
कांही क्षण गेले. माझ्या मानवी मनामध्ये स्वार्थी विचार आला. या छोट्या मित्राला शब्दांत तर पकडता येत नाही पण याला आपण हाताने पकडुया, किमान खुर्चीच्या बाजुलाच ठेवलेल्या मोबाईलच्या व्हिडीओमध्ये तरी पकडुया. माझ्या मनातील ही स्वार्थी वासना माझ्या छोट्या मित्राने जाणली. आपले टप्पोरे काळे डोळे त्यांने माझ्यावर रोखले. डोळ्यांना डोळ्यांची भाषा समजली, हृदयाने हृदयाची भावना जाणली. माझ्या मनांत फेर विचार आला, मला जर कोणी असे चिमटीत पकडले, बंदिस्त केले, माझ्या स्वातंत्र्यावर रोख लावला तर मला आवडले कां? मी चरकलो, चुक लक्षात आली आणि मनाच्या लहरीतुन मित्राला संदेश दिला, ‘माफ कर मित्रा, माझे चुकले.’
मित्राच्या गालावर खुदकन हासु उमटले आणि अहो आश्र्चर्यम्, पानावरून तो जे थेट उडाला तो माझ्या गुडघ्यावर. माझ्याकडे पाहुन स्मितहास्य करू लागला. माझ्या या छोट्या मित्राचे आगमन, त्याचा निरागसपणा, त्याचा स्वच्छंद विहार, माझे मन आनंदाने थुई-थुई नाचु लागले. जीवनातील खरा आनंद म्हणजे काय ते मला त्या क्षणाला समजले.
जगाचे भान विसरलेल्या त्या निखळ आनंदात कांही क्षण गेले. मित्राने आपले पंख पसरले आणि परत एक वेळ ते झाडाच्या दिशेने वळुन बघता-बघता बाल्कनीतुन बाहेर गेले. त्याच्या जाण्याने मी मनांतुन थोडा खट्टु झालो. पण तो परतला आणि माझ्या मनाला दिलासा देत म्हणाला, “मित्रा, तुला माहीती आहे कां, आम्ही फुलपांखरे मोजत नाही महिने पण मोजतो क्षण, आणि मिळवतो मुबलक वेळ.-१
माझा मित्र आपल्या आनंदी जीवनाचे रहस्य सांगतांना म्हणाला, " भगवंताच्या कृपेने जगायला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद आम्ही लुटतो, इतरांनाही देतो. तू एकटा असतांना, किंवा तूला एकाकी वाटत असतांना, माझी मनांपासुन आठवण कर, मला साद दे आणि बघ मी परत येईन. मग आपण दोघेही सुंदर फुले पाहुया, पानांचे विविध रंग लुटुया, ढगांच्या आड लपुन सुर्याच्या किरणांशी लपंडाव करूया, वा-याबरोबर पळण्याची शर्यत लावुया आणि लहान मुलासारखे बागडु, नाचुया, ..... खुप-खुप मज्जा करूया.”
आनंदी जीवनाचे गुपीत माझ्यापुढे उघडे करून माझ्या त्या छोट्या मित्रांने आपले पंख पसरले व हळुवारपणे तो निघुन गेला पण जाताना माझ्या विचारांचे पंख पसरवुन गेला आणि हे पसरलेले विचार काव्यरूपाने उतरले.
एक आळी अंड्यातुन बाहेर आली
तिच्या मनाला येईल तसे वागु लागली
पाय फुटले काम-क्रोधाचे तिला
गुर्मीने नाही जुमाने कोणाला
दुष्ट विचारांचा कोश विणुन स्वतः भोवती
एक दुष्ट कुरूप किडा ती होती बनली
असाच कांही काळ गेला
आळीच्या अंतरंगात बदल झाला
कोश ‘ स्व ’ भोवतीचा आपोआप तुटला