yuva MAharashtra २४ ऑगस्ट २०२४ रोजी महाविकास आघाडीने दिली महाराष्ट्र बंदची हाक !

२४ ऑगस्ट २०२४ रोजी महाविकास आघाडीने दिली महाराष्ट्र बंदची हाक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला. त्याची तक्रार द्यायला गेलेल्या त्या मुलीच्या आईला पोलिसांनी बारा तास बसवून ठेवले. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्य सरकार लाडकी बहिण योजनेसारखे ढोंग करत असताना समाजात मुली, महिला सुरक्षित आहेत का, हा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्याविरोधात समाजमनात संतापाची लाट उसळली आहे. संवेदनशील समाजमन याविरोधात आपला संपात विविध मार्गाने व्यक्त करत आहे.

महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, यांसह विविध पक्ष, संघटनांनी शनिवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, माजी नगरसेवक, वरिष्ठ कार्यकर्ते यांची बैठक आज माधवनगर रोडवरील हाॅटेल स्काय अव्हेन्यू मध्ये पार पडली.


या बैठकीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, शिवसेनेचे संजय विभूते यांनी व विविध घटक पक्षाच्या प्रतिनिधींनी सूचना केल्या. या बैठकीत पुढीलप्रमाणे मूक मोर्चाचे नियोजन करण्याचे ठरले।

शनिवारी दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येईल. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून स्टेशन चौक सांगली पर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणारआहे. व कलेक्टरना निवेदन देण्यात येणार आहे. अशाच प्रकारे मिरज, कुपवाड व ग्रामीण भागात मूकमोर्चे निघतील.

राज्यभर महाविकासआघाडी व जनतेच्या पुढाकाराने शासनाचा व महिला वमुलींवर अत्याचार करणाऱ्यांचानिषेध करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने मुकमोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले.


या बैठकीत बजरंग पाटील, धनपाल खोत, कारीमभाई मेस्त्री, असिफ बावा, नितिन मिरजकर, महेश खराडे, वसीम मुल्ला, डॉ. संजय पाटील, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, हरिदास पाटील, अभिजित भोसले, ज्योति अदाटे, प्रमोद सूर्यवंशी, शाहीन शेख, सचिन जगदाळे, सागर घोडके, मुश्ताक रंगरेज, शिवाजी मोहिते, बिपिन कदम, सनी धोतरे, संगीता हरगे, मयुर घोडके, आशा पाटील, अजीज मेस्त्री, रविंद्र वळवडे, उत्तम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.