| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑगस्ट २०२४
सांगली मधील शामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफन भूमीच्या जागेच्या भूसंपादनामध्ये अंदाजे 16 कोटी रुपयांचा घोटाळा होणार असून, सदरची जागा दफन विधीसाठी योग्य नसल्याने येथे मृतदेहांची विटंबनाच होणार आहे. महापालिकेच्या 2017 साली झालेल्या महासभेत सदर जागेसाठी दहा कोटींची किंमत ठरली असताना आता त्याची किंमत 24 कोटी इतकी कशी झाली ? याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार निखिल शिंदे यांनी म्हटले आहे.
सदर जागेच्या मूमालकांनीने गुंठेवारीने प्लॉट करून विक्री केली आहे. येथील प्लॉट धारकांनी महापालिकेकडेवारीची प्रमाणपत्रे मागितली आहेत. त्यामुळे या साऱ्या प्रकारात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दफनभूमी जागा घोटाळे प्रश्न चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे काय झाले ? असा सवालही नितीन शिंदे यांनी केला आहे.
या प्रकरणात काही मुस्लिम नेत्यांनी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इतकेच नव्हे तर काही मात कट्टर पंथीय मुस्लिम तरुणांची माते भडकवण्याचे काम या मंडळीने सुरू केले आहे. आपण याबाबत आवाज उठवल्यामुळे असे बाबा यांच्या मुस्लिम व्हाट्सअप ग्रुप वर उबेद बागवान याने आपल्याला 'वर्गणी काढून सुपारी द्या !' असे वादग्रस्त लिखाण केलेले आहे. याची जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांनी चौकशी करावी अशी मागणी ही नितीन शिंदे यांनी केली आहे.