| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
आठ ऑगस्टला सांगली शहरामध्ये मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीमध्ये सांगली जिल्ह्यातून आलेल्या लाखो मराठा बांधव यांची गैरसोय होऊ नये म्हणून व सामाजिक भावनेच्या प्रेरणेतून विश्रामबाग चौक, पुष्पराज चौक, राम मंदिर कॉर्नर, सांगली या ठिकाणी मराठा स्वराज्य संघ व केमिस्ट्री, ड्रगिष्ट असोसिएशन यांच्या वतीने सर्वांची मोफत अल्पवहाराची व्यवस्था केली होती, त्याबद्दल राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल श्री लक्ष्मीनारायण फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष माननीय रमेश अण्णा चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत मालवणकर, सेक्रेटरी सुधाकर नार्वेकर यांच्या हस्ते राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळेला प्रभारी अध्यक्ष गजानन पोतदार, विजय देसाई, सचिव अमित देसाई, सुशांत नार्वेकर, विजय कल्याणकर, शंकरराव मोहिते, रणजीत चव्हाण, कपिल मालवणकर, संभाजी पाटील व इतर अनेक जण उपस्थित होते.
या वेळेला सर्वांनी राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी उत्तर देताना, राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी सामाजिक कार्यामध्ये सांगलीतील आघाडीवर असणाऱ्या लक्ष्मीनारायण फाऊंडेशनच्या वतीने सत्कार केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेश अण्णा चव्हाण, उपाध्यक्ष, सचिव, व सर्व संचालकांचे आभार मानले व संस्था भविष्यात सामाजिक कार्यात अग्रेसर राहील अशा शुभेच्छा दिल्या.