yuva MAharashtra काँग्रेस सेवादलाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी अनिल मोहिते यांची निवड !

काँग्रेस सेवादलाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी अनिल मोहिते यांची निवड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. अनिल मोहिते सर यांची काँग्रेस सेवादलाच्या शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष श्री. विलास औताडे यांच्या कडून सांगली जिल्हा काँग्रेस कडे निवडीचे पत्र प्राप्त झाले होते. 
स्वातंत्र्यदिनी काँग्रेस भवन सांगली येथे काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते श्री. अनिल मोहिते सर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी काँग्रेस सेवादलाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. अजित ढोले, माजी जि. प. अध्यक्षा सौ. मालनताई मोहिते, सेवादलाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश जगताप, मिरज तालुकाध्यक्ष मा. गुलाबराव भोसले, प्रशांत देशमुख, वसंतराव काळे, भाऊसाहेब पवार, राजेंद्र कांबळे, अरुण पळसुले, पैगंबर शेख, मौलाअली वंटमुरे, सुरेश गायकवाड, ढाले सर, एन. डी बिरनाळे सर आणि सेवादलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


श्री. अनिल मोहिते सर यांनी गेल्या वर्षी सेवानिवृत्तीनंतर माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री मा. अशोक चव्हाण यांचे हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. श्री. अनिल मोहिते सर हे देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड चे संस्थापक अध्यक्ष आहेत, तसेच सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष आहेत. काँग्रेस पक्ष आणि सामाजिक कार्यामधील असलेला सक्रिय सहभाग पाहुन त्यांची शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केली असल्याचे मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस सेवादलाला पुढील काळात बळकटी आणणार असे मत श्री. अनिल मोहिते यांनी मांडले.