Sangli Samachar

The Janshakti News

प्रभाग समिती दोन मधील नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी अधिकारी व माजी नगरसेवकांची नागरिकांसह बैठक संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० ऑगस्ट २०२४
सांगली महापालिकेचे आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांनी नागरिकांच्या समस्या समजून अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना केल्या असल्याने, उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. आयुक्त विद्या सानप आणि डॉ रवींद्र ताटे यांनी माजी नगरसेवक श्री. मंगेश चव्हाण आणि श्री. फिरोज पठाण यांच्या पुढाकाराने काल बैठक सपन्न झाली.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग समिती क्र. २, वार्ड क्रमांक पंधरा येथील सिव्हिल हॉस्पिटल समोर गणेश नगर गल्ली क्रमांक २ ते ५ येथील दवाखाने, लॅबोरेटरी इतर आस्थापनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीस अडथळा व अस्वच्छता होत असल्याबाबत, तसेच सदर ठिकाणच्या नागरिकांच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तक्रार अर्ज दिलेला होता. नागरिकांनी आपल्या समस्या अर्जाव्दारे मांडल्या.

सहा. आयुक्त सौ. विद्या सानप यांच्या उपस्थितीत आणि माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण आणि त्या परिसरातील नागरिक उपस्थित होते, 

प्रभाग समिती क्रमांक २ क्षेत्रीय कार्यालय येथे सदरची बैठक आज सपन्न झाली. सदर परिसरातील नागरिक, दवाखान्याचे प्रतिनिधी, नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग सह अन्य विभागाचे अधिकारीही या वेळी उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये नागरिकांनी गणेश नगर गल्ली क्र १ येथे उपचार साठी आलेले रुग्ण नातेवाईक वाहन पार्किंग रस्त्यावर होत असल्याबाबत व त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याबाबत तक्रार केली आहे. तसेच वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेले नागरिक रस्त्यावरच खाऊचे साहित्य, फळे, नारळ कोठेही टाकत आहेत. त्यामुळे अस्वच्छतेमुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. तसेच मावा, तंबाखू, गुटखा खाऊन रत्यावर थुकणे व अस्वच्छता करत असल्याने नागरिकांना याचा खूप त्रास होत असल्याबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले.


या तक्रारींची दखल घेऊन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र ताटे व सहा. आयुक्त विद्या सानप-घुगे यांनी तक्रारीचे प्रशासकीय स्तरावर दखल घेऊन, पुढील कार्यवाही तत्काळ प्रस्तावित करत असल्याबाबत आश्वासन दिले.
नागरिकांनी सदरची बैठक महापालिका वतीने घेऊन तक्रारी अनुषंगाने नागरिकांची भूमिका समजून घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि फिरोज पठाण यांनी देखील समनव्याने मार्ग काढण्यासाठी साठी चांगली बाजू मांडली आहे, 

सदर बैठकीसाठी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक फिरोज पठाण तसेच विपुल केरीपाळे, शाखा अभियंता युनूस मंगळवारे, अतिक्रमण विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे व प्रभाग समिती क्रमांक २ चे सर्व स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.