yuva MAharashtra निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या डेटावर गंभीर प्रश्नचिन्ह ?

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या डेटावर गंभीर प्रश्नचिन्ह ?


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ४ ऑगस्ट २०२४
मतमोजणी मशीन अस्तित्वात आल्यापासून, मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर नेहमीच टीका करण्यात येत असते. एखाद्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीत हरला की त्याचे खापर मतदान यंत्रावर फोडले जाते. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या डेटावर ADR आणि VFD या संस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

या प्रकरणात ADR आणि पत्रकार पुनम अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाला यासंबंधी काही प्रश्न विचारले होते मात्र अद्यापही निवडणूक आयोगाकडून त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची वोटिंग फॉर डेमोक्रॅटिक (VFD) या संस्थेच्या म्हणण्यानुसार सात टप्प्याच्या वोटिंग टर्न आऊट आणि फायनल डेटा मध्ये पाच कोटीहून अधिक मतांचा फरक दिसून येत आहे. तर काही टप्प्यात वोटिंग शेअर तीन टक्के वा काही टप्प्यात वोटिंग शेअर पाच टक्क्याने वाढले आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसामध्ये हा आकडा 12% पर्यंत असल्याचा आरोपही VFD कडून करण्यात आला आहे.


लोकसभा निवडणुकीतील या साऱ्या गोंधळाचा फायदा भाजपाला झाला असल्याचा दावा या दोन्ही संस्थांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर लोकप्रिय पत्रकार रविष कुमार यांनी प्रसिद्ध केलेल्या स्पेशल शो वर निवडणूक आयोग काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.