| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगलीच्या सात स्केटिंगपटूंनी विक्रमाला गवसणी घातली. येथील सांगली, मिरज, कुपवाड शहर रोलर स्केटिंग असोशियन व सई स्केटिंग अकॅडमीच्या वतीने एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या सात स्केटिंग खेळाडूंनी सलग सहा तास स्केटिंग करीत, नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची नोंद रॉयल रेकॉर्ड, एस्क्युसाईट रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड, आणि युनियन रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
सदर रेकॉर्डची सुरुवात सकाळी 11 वाजता माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मुख्याध्यापक नितीन कोळी, मार्गदर्शक अर्चना सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. सलग सहा तास स्केटिंग झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता याची सांगता झाली. रॉयल रेकॉर्डचे सांगली जिल्ह्याचे ऑफिशियल ऑबजरवर सुरज शिंदे यांनी रेकॉर्ड पूर्ण झाल्याची घोषणा केली. यानंतर पै. पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते सदर तीन रेकॉर्डचे प्रमाणपत्र संघटनेस प्रदान करण्यात आले.
यावेळी भीमसेन नवलाई, संदीप जाधव, विनय व्हनमोरे, प्रशिक्षक सुरज शिंदे, महिला स्केटिंग प्रशिक्षिका परविन शिंदे, आयेशा मुलाणी, पंकजसिंह देशमुख, गौराज कांबळे यांच्यासह अनेक खेळाडू व पालक उपस्थित होते. सांगली जिल्ह्याच्या क्रीडा विश्वात एका नव्या विक्रमाची नोंद झाल्याने, या स्केटिंगपटूंचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.