Sangli Samachar

The Janshakti News

खा. प्रवीण खंडेलवाल यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी 'हर दुकान तिरंगा' अभियान राबवावे - अतुल शहा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑगस्ट २०२४
अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेल्या निर्णया प्रमाणे खा. प्रवीणजी खंडेलवाल यांच्या आदेशावरुन संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी आपले देशा प्रति प्रेम व अखंडता जाणून संपूर्ण देशातील प्रत्येेक व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकविण्याचा संकल्प करुन तिरंगा झेंडा फडकवून आपल्या देशा प्रती आदर सन्मान जाहीर करावा व आपल्या देशाची तसेच व्यापारी वर्गाची एकजुटता संपुर्ण जगाला दाखवून द्यायची आहे, असे आवाहन सांगली व्यापारी असोशियन तर्फे अतुल शहा यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.


सांगली जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना या पत्रकाद्वारे आवाहन करताना अतुलशहा यांनी म्हटले आहे की, प्रत्येक व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार आणि तिरंग्याचा योग्य तो मान राखून, आपल्या प्रतिष्ठानावर तिरंगा फडकवून देशाच्या व आपल्या एकजुटतेचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य करावयाचे आहे. 

सर्वच व्यापाऱ्यांनी आपली एकजुटता दाखवून ह्या राष्ट्राप्रती आपला आदर सादर करण्याच्या मोहिमेत स्वेच्छेने सहभागी व्हावे आणि आपल्या शेजाऱ्यालासुध्दा ह्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे आणि ही राष्ट्र प्रेमाची मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वेच्छेने,एकजुटतेने कार्य करावे, असेही अतुल शहा यांनी या पत्रकात म्हटले आहे.