yuva MAharashtra सावली केंद्रातील बेघरांना राखी बांधून पृथ्वीराज पाटील फौंडेशनने जपली माणुसकी - सौ. विजया पृथ्वीराज पाटील

सावली केंद्रातील बेघरांना राखी बांधून पृथ्वीराज पाटील फौंडेशनने जपली माणुसकी - सौ. विजया पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
ज्यांना कोणीच वारसदार नाही अशा बेघरांना पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनकडून सौ. विजया पृथ्वीराज पाटील यांनी सांगली येथील सावली बेघर केंद्रात राखी बांधून अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा केला आणि माणुसकी जपली.

यावेळी बेघर केंद्रातील जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान पाहून विजया पाटील म्हणाल्या, 'केंद्रातील अनेक व्याधींनी ग्रस्त आणि वारसदार नसलेल्या जेष्ठांना राखी बांधताना बहिणीचं हृदय भरुन आलं. भावनिक आपुलकीने अंगावर शहारे आले. या केंद्रात बेघरांची सेवा करणाऱ्या मुस्तफा मुजावर यांच्या मानवतावादी सेवाभावी कार्याचा पृथ्वीराज पाटील व फौंडेशनला अभिमान वाटतो.' 


यावेळी मुस्तफा यांचे बंधू रफीक मुजावर यांनाही विजयावहिनींनी राखी बांधून सर्वांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो असा आशीर्वाद दिला. 

मुस्तफा म्हणाले, 'या जगात ज्यांना कोणीच वारसदार नाही अशा बेघरांना पृथ्वीराज पाटील (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली विजयावहिनींनी औक्षण करून राख्या बांधल्या. यापेक्षा जगात कोणतीच गोष्ट मोठी नाही.  

यावेळी जायंटस ग्रुपच्या सौ. सुनिता शेरीकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रणिती पवार, मराठा महासंघाच्या आशा पाटील, सौ. किर्ती देशमुख व सौ. अरुणा सुर्यवंशी यांनी बेघरांना राख्या बांधल्या. तसेच फौंडेशनकडून बेघरांना मिठाई वाटण्यात आली. वंचित आणि अनाथ बेघरांना राखी बांधून पृथ्वीराज पाटील आणि फौंडेशनने आम्हाला जगण्यासाठी उर्जा दिली अशा प्रतिक्रिया बेघर जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.