Sangli Samachar

The Janshakti News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगलीतील लाडक्या बहिणीने दिले अनोखे 'गिफ्ट' !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
'होय नाही, होय नाही', असे करीत... मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नुकतीच कार्यान्वित झाली. काही बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेही... जवळपास दीड कोटी बहिणींच्या खात्यावर हे प्रत्येकी तीन हजार रुपये दर महिन्यात जमा होणार आहेत. यामुळे महिला वर्गात मुख्यमंत्र्यांबाबत सहाजिकच एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. ही भावना व्यक्त करण्यासाठी अनेक बहिणींनी विविध मार्ग निवडले. परंतु सध्या चर्चेत आहे ती सांगलीतील स्टेला सकटे ही महिला...

सकटे हिने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चक्क आपले मंगळसूत्र मोडत, मुख्यमंत्र्यांसाठी राखी बनवलेली आहे. अर्धा तोळे सोन्याच्या दागिन्याची ही राखी सकटे यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जमाही केली आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहावे अशी मागणी करत ही अनोखी भेट दिल्याचे स्टेला सकटे यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांकडून यापेक्षा मोठी अपेक्षा नाही परंतु त्यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबरोबरच इतर योजनाही कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात असे मनोगत स्टेला सकटे यांनी व्यक्त केले आहे.


दरम्यान मुंबईतील सह्याद्री अतिविग्रहाच्या पायऱ्यावर एकत्र जमून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही भगिनींनी राख्या बांधल्या आहेत यावेळी महिलांनी लाडक्या भावाला ओवाळून त्यांनी दिलेल्या या आर्थिक मदतीबद्दल मनापासून आभार मानले आहेत. हातात पूजेचे ताट आणि राखी व मिठाई घेऊन महिलांनी सह्याद्री अतिथी ग्राहक एकच गर्दी केली होते.

सध्या सांगली जिल्ह्यातील प्रत्येक बँकेत महिलांचे मोठी गर्दी होत आहे. आपल्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का ? अशी विचारणा या महिला करीत आहेत. काही महिलांच्या खात्यावर दोन दिवसापूर्वीच तीन हजार रुपये जमा झाले आहेत. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही, परंतु ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नाहीत, त्यांच्या जीवाचे मात्र घालमेल होत आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीस तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे बँकेतून व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगून महिलांना दिला आहे.