| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ ऑगस्ट २०२४
मागील वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या अहवालाने भारतीय उद्योग क्षेत्रात मोठे खळबळ माजली. ज्यांच्यावर आरोप झाले त्या अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळले. गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या अहवालाने भारतीय उद्योग क्षेत्रात त्सुनामी आली आहे.
या नव्या अहवालात सेबीच्या चेअरमन माधवी पुरी-बूच यांच्यावर गंभीर आरोप केले असून अदानी शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचाही हात असल्याचा अहवालात खुलासा करण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाला असून माधवी पुरी आणि त्यांचे पती धवन बूच हे अदानींच्या मनी सिफनिंग स्कॅन्डलमध्ये दोन्ही ऑफशोर निधीमध्ये भागीदारी असल्याचा दावा केला आहे.
हिंडेनबर्गनेच्या अहवालानुसार सध्याच्या सेबी अध्यक्ष माधवी पुरी आणि त्यांचे पती धवल भुज यांची बर्मुरा आणि मॉरिशस फंडामध्ये छुपी हिस्सेदारी होती. याचा वापर विनोद आदानी यांनी केला होता. अहवालात पुढे म्हटले आहे की, पाच जून 2015 रोजी माधवी पुरी आणि धवलबुची यांनी नागपूर मध्ये आयपीएस फंड एक मध्ये खाते उघडले होते यामध्ये त्यांच्या गुंतवणुकीचा स्त्रोत हा त्यांचा पगारच असल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच या दांपत्याचे एकूण संपत्ती दहा दशलक्ष डॉलर इतकी असल्याची नोंद केली आहे.
काय म्हटलंय हिडेंनबर्ग अहवालात ?
हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालामध्ये म्हटलं की, आम्ही अदानी समुहाबाबत रिपोर्ट सादर करुन सुमारे १८ महिने झाले आहेत. यामध्ये आम्ही प्रामुख्यानं मॉरिशसस्थित शेल कंपन्यांच्या एका मोठ्या नेक्ससचा खुलासा केला होता. या कंपन्यांचा उपयोग संशयास्पद अरबो डॉलर्सचा उपयोग अघोषित व्यवहार, गुंतवणूक आणि शेअर्सच्या हेराफेरीसाठी केला जात होता. आपल्या रिपोर्टनं या घोटाळ्याचे पुरावे देऊनही तसेच ४० हून अधिक माध्यम संस्थांनी स्वतंत्ररित्या तपासणीतून पुरावे समोर आलेले असतानाही सेबीनं अदानी समुहावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट २७ जून २०२४ रोजी सेबीनेच आम्हाला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
हिंडेनबर्गनेच्या अहवालावर आता सेबी आणि केंद्रशासन काय पावले उचलते ? आणि त्याचा गुंतवणूकदार व शेअर बाजारावर काय परिणाम होतो ? असा प्रश्न उपस्थित होत असून आगामी काळात त्याचे उत्तर मिळू शकेल.